Lumpy Skin : सिंधुदुर्गात आतापर्यंत ३६ जनावरे मृत

लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावामुळे १,०४७ जनावरांना लागण
Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease Agrowon

वैभववाडी ः जिल्ह्यात लम्पी स्कीनचा (Lumpy Skin) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत १०४९ जनावरांना लागण झाली असून, त्यापैकी ३६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. कणकवली आणि कुडाळ तालुक्यांत अधिक प्रभाव जाणवत असल्यामुळे तेथील पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे मृत जनावरांच्या पशुपालकांसाठी एक कोटीचा निधी

गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागांत लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव जाणवत होता. परंतु सिंधुदुर्ग जिल्हा लम्पी स्कीन प्रादुर्भावापासून काहीसा दूर होता. परंतु महिनाभरापासून जिल्ह्यात लम्पी स्कीनचे जनावरे आढळून येण्यास सुरुवात झाली. कुडाळ आणि कणकवली तालुक्यातील अनेक गावांमध्ये हा प्रादुर्भाव अधिक जाणवत होता. परंतु त्यानंतर जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये देखील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव जाणवू लागला.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin : मृत जनावरांच्या मालकांना मदतीसाठीच्या अटी रद्द

लम्पी स्कीनची लागण दिवसेंदिवस वाढत असून आतापर्यंत १ हजार ४९ जनावरांना लागण झाली आहे. त्यापैकी ३६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ५४३ जनावरे उपचाराने पूर्णपणे बरी झाली आहेत. उर्वरित जनावरांवर पशुसंवर्धन विभागाकडून उपचार सुरू आहेत. जनावरे दगावलेल्या ९ पशुपालकांना १ लाख ९८ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित पशुपालकांना देखील अनुदान देण्याची प्रकिया सुरू आहे. लम्पीच्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागाने १ लाख २ हजार ५३९ जनावरांना लसीकरण केले
आहे.

लम्पी स्कीनमुळे जिल्ह्यात ३६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. १०४९ जनावरे बाधित झाली असून त्यापैकी ५४३ पूर्णपणे बरी झाली आहेत. उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहे. जनावरांमध्ये लम्पी स्कीनची लक्षणे आढळून येताच तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करून घ्यावेत.
डॉ. विद्यानंद देसाई, पशुसंवर्धन अधिकारी, सिंधुदुर्ग

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com