Electricity Theft : राज्यात तीन दिवसांत ३८३ वीजचोऱ्या उघडकीस

‘महावितरण’च्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसीय विशेष तपासणी मोहिमेत राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.
Electricity Theft
Electricity TheftAgrowon

Nashik News ‘महावितरण’च्या (Mahavitaran) सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसीय विशेष तपासणी मोहिमेत राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल ३८३ वीजचोरीची (Electricity Theft) प्रकरणे उघडकीस आली आहेत.

Electricity Theft
Electricity Theft : श्रीरामपूर ‘एमआयडीसी’त २९ लाखांची वीजचोरी उघड

यात मोठ्या प्रमाणात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. या प्रकरणी अंदाजे ३ कोटी ५० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चार परिक्षेत्रांमध्ये २४ ते २६ एप्रिल दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

Electricity Theft
Electricity Theft : पुणे विभागात ४९९ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस

या तीन दिवसांत नागपूर परिक्षेत्रांतर्गत सर्वाधिक १२१, कोकण परिक्षेत्रात ११७, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात ९२ तसेच पुणे परिक्षेत्रांतर्गत ५३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली.

‘महावितरण’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात ही मोहिम सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक (प्रभारी) मुंबई सुमित कुमार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली.

भविष्यात अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा राबविण्यात येतील. त्यामुळे ग्राहकांनी वीजचोरी न करता वीजेचा अधिकृत वापर करून महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन ‘महावितरण’तरर्फे करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com