Rabi Sowing : सांगली जिल्ह्यात ३९ टक्के रब्बीचा पेरा; रब्बी पेरणीस अडथळा

जिल्ह्यात आतापर्यंत रब्बी हंगामातील ३९ टक्के अर्थात ७५ हजार ९२४ हेक्टरवर पेरा झाला आहे. मात्र, परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीस अडथळा निर्माण झाला आहे.
Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon

सागंली ः जिल्ह्यात आतापर्यंत रब्बी हंगामातील (Rabi Sowing) ३९ टक्के अर्थात ७५ हजार ९२४ हेक्टरवर पेरा झाला आहे. मात्र, परतीच्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीस (Crop Harvesting) अडथळा निर्माण झाला आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी, वाफसा नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली आहे.

Rabi Sowing
Rabbi Sowing : खानदेशातील रब्बीची पेरणी १३५ टक्क्यांवर पोहोचणार

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र १ लाख ९० हजार ९६१ हेक्टर आहे. कृषी विभागाने २ लाख ४४ हजार हेक्टरवर रब्बीचे नियोजन केले आहे. त्यादृष्टीने ३९ हजार ७८९ क्विंटल बियाणे, तर १ लाक ८० हजार ६१५ टन खतांची मागणी केली आहे. वास्तविक पाहता, जत तालुक्यात गेल्या महिन्यापासून ज्वारीची पेरणी सुरू झाली आहे. त्यासाठी कृषी विभागाने ६५ टन ज्वारीचे बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले आहे.

जत तालुक्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र ६३ हजार ९१९ हेक्टर असून ४९ हजार ०१४ हेक्टवर पेरा झाला आहे. जत तालुक्यासह आटपाडी, कवठे महांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीचे नियोजन केले होते. त्यानुसार शेतीची मशागतही केली होती. परंतु जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी, अजूनही शेतात पाणी साचून आहे. वाफसा आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करता येत नसल्याचे चित्र आहे.

शिराळा तालुक्यात भात काढणीची लगबग सुरू आहे. त्यानंतर रब्बी हंगामातील मका, गहू आदी पिकांची पेरणी करण्यासाठी शेतकरी पुढाकार घेतील.

पिक निहाय पेरणीवर दृष्टीक्षेप (हेक्टरमध्ये)

ज्वारी ६८ हजार ४३५

मका ६ हजार ४८४

हरभरा ९५२

गहू २२

सूर्यफुल २८

रब्बी हंगामातील तालुकानिहाय पेरणी

मिरज ५६१७

जत ५३९०३

खानापूर ८५

वाळवा २२

तासगाव ५२८

आटपाडी ११५६५

कवठे महांकाळ २७४४

पलूस ३३

कडेगाव १५१५

एकूण ७५२९४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com