Farm Mechanization : कृषी यांत्रिकीकरणाचे ४ कोटी ३ लाख रुपये जमा

कृषी विभागाची पुर्वसमंती घेऊन अवजारे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात ४ कोटी ३ लाख ६३ रुपये जमा करण्यात आले आहेत.
Farm Mechanization
Farm MechanizationAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः कृषी विभागाची (Department of Agriculture) पुर्वसमंती घेऊन अवजारे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात ४ कोटी ३ लाख ६३ रुपये जमा करण्यात आले आहेत. २०२२-२३ वर्षांसाठी कृषी यांत्रिकीकरणाकरिता (Farm Mechanization) ४ कोटी २१ लाख २५ हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

Farm Mechanization
Crop Damage Compensation : अतिवृष्टिग्रस्तांना अनुदानासाठी दावरवाडी फाट्यावर ‘रास्ता रोको’

शेतकऱ्यांना कृषी अवजारे पुरविण्यासाठी शासनाने कृषी यांत्रिकीकरण योजना सुरू केली. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, राष्ट्रीय कृषी योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना आदी योजनांतर्गत शेतकऱ्यांना पॉवर टिलर, ट्रॅक्टर, पॉवर विडर, ब्रश कटर, मळणी यंत्र, कापणी यंत्र, यासह विविध कृष अवजारे खरेदी करता येतात. या कृषी यांत्रिकीकरण योजनांचा लाभ घेण्यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल सुरू केले.

या पोर्टलवर शेतकऱ्यांना अनुदानासाठी अर्ज करावे लागतात. जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या पुर्वसमंतीनंतर कृषी अवजारे खरेदी केली होती. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात शासनाने अनुदान जमा केले आहे. यामध्ये कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेअंतर्गत १ कोटी ५९ लाख ८० हजार, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत १ कोटी ४४ लाख ९२ हजार रुपये, राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत ९८ लाख ९१ हजार असे एकूण ४ कोटी ३ लाख ६३ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत.

Farm Mechanization
Agri Commodity MSP : रब्बी हंगामातील पिकांसाठी हमीभाव जाहीर | ॲग्रोवन

२०२२-२३ करिता ४ कोटी २१ लाख २५ हजारांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांना कृषी अवजारे, यंत्रे खरेदी करावयाची आहेत, अशा शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक एस. डी. दिवेकर यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com