नुकसानग्रस्त बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी हवेत चार कोटी

मामा तलाव, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग व साठवण बंधाऱ्याचा समावेश असून ४ कोटी ९० लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
Damage Repair
Damage RepairAgrowon

भंडारा ः जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने (Heavy Rain) जलसंधारण विभागाचे (Department of Water Conservation) ४३ बंधारे उद्ध्वस्त झाले. त्यात मामा तलाव, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग व साठवण बंधाऱ्याचा समावेश असून ४ कोटी ९० लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Damage Repair
Wet Drought : पावसाचा जोर कमी; एका मंडलात अतिवृष्टी

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी, संततधार पावसाची झळ मात्र जलसंधारणाच्या कामांना बसली. यंदा तीनवेळा पूर व अतिवृष्टी झाली. यामुळे नाल्यावर बांधलेल्या बंधाऱ्याचे व तलावांचे मोठे नुकसान झाले. जलसंधारण विभागाच्या सर्वेक्षणात ४३ सिमेंट प्लग, साठवण तसेच कोल्हापुरी बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Damage Repair
Wet Drought :मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीस प्राधान्य देवू ः फडणवीस

पूर व अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद जलसंधारण विभागाचे ४ कोटी ९० लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या निधीच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठविण्यात आला असून तो मिळाल्यानंतरच दुरुस्तीची कामे होणार आहेत.

जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांना मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाचा विळखा आहे. याचा सिंचन क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. तलावांच्या जागेवर अनेकांनी शेती केल्याने सिंचन क्षमतेवर परिणाम होण्यासोबतच जलसाठ्यातही मोठी घट झाली आहे.

Damage Repair
Wet Drought : ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी

नुकसानग्रस्त बंधारे व तलाव

जांभोरा, झबाडा, हरदोली, नेरी, विहिरगाव, सिदपुरी, देव्हाडी, घुटेरा, पिटेसूर, बोर्डी, गर्रा, तुडकापुरी, आतेगाव, उकारा, नेरला, निष्टी, सोनेगाव, वाही, कान्हळगाव येथील मामा तलाव. महालगाव, कान्हळगाव, चिंचोली, आंधळगाव, पिंपळगाव, सीतेपार, विहीरगाव, लोभी, साकोली, खापरी रेहपाडे येथील साठवण बंधारे, निलागोंदी, गोंडीशिवनाला येथील लघू पाटबंधारे तलाव, तर भावड येथील सिमेंट प्लग बंधाऱ्याचा समावेश आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com