Rabi Sowing : जिल्ह्यात रब्बीची ४१.९४ टक्के पेरणी

अतिवृष्टीच्या पावसाचा खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगामालाही फटका बसला आहे. परतीचा पाऊस उशिरा गेल्याने मशागत व पेरणी वेळेत सुरू होऊ शकलेली नाही. जिल्ह्यात ४१.९४ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

सातारा ः अतिवृष्टीच्या पावसाचा खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगामालाही (Rabi Season) फटका बसला आहे. परतीचा पाऊस उशिरा गेल्याने मशागत व पेरणी (Rabi Sowing) वेळेत सुरू होऊ शकलेली नाही. जिल्ह्यात ४१.९४ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. पेरणीस उशीर झाल्यामुळे सरासरीपेक्षा कमी क्षेत्रात पेरणी होण्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

जिल्ह्यात माण, खटाव, फलटण, खंडाळा व कोरेगाव या दुष्काळी तालुक्‍यांचा रब्बी हंगाम हा प्रमुख आहे. यामुळे या तालुक्ं‍यात रब्बी हंगामात जास्त पेरणी होते. रब्बी हंगामात पिकांचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र दोन लाख १३ हजार ३७७ हेक्‍टर असून, त्यापैकी ८९ हजार ४८२ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Rabi Season
Crop Damage Survey : ‘पंचनामे राहिलेल्या शेतकऱ्यांनो संपर्क साधा’

त्यात माण तालुक्‍यात सर्वाधिक २५ हजार ४११ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीची यंदा सर्वाधिक पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३६ हजार ५१५ हेक्‍टर असून, त्यापैकी ६८ हजार २१ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ७२४ हेक्‍टर असून, त्यापैकी ७ हजार २८६ हेक्‍टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.

मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र ११ हजार ६२१ हेक्‍टर असून, सात हजार २८६ हेक्‍टर क्षेत्रावर मक्‍याची लागवड झाली आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार ८५० हेक्‍टर असून, त्यापैकी पाच हजार ८१७ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी हंगामाच्या सुरू होण्या अगोदरच अतिवृष्टी झाल्याने हंगाम सुरू होण्यास विलंब झाल्याने पेरणीची क्षेत्र कमी दिसत आहे. हंगाम विलंबामुळे या हंगामात रब्बी क्षेत्रात घट होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com