Rain Update : राजूरला ४२ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यातील बहुतांश भागांत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. काही भागात पावसाने उघडीप दिली असली तरी अनेक भागांत ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : जिल्ह्यातील बहुतांश (Pune Rain Update) भागांत कमीअधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. काही भागात पावसाने उघडीप दिली असली तरी अनेक भागांत ढगाळ वातावरणाची (Cloudy Weather) स्थिती कायम आहे. सोमवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये जुन्नर तालुक्यातील राजूर येथे ४२ मिलिमीटर पाऊस (Rainfall In Rajur) पडल्याची नोंद झाली आहे.

Rain Update
Tur Sowing : जतमध्ये तूर क्षेत्रात ८०० हेक्टरने घट

चालू जुलै महिन्यात पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने काहीशी उघडीप घेतली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे; मात्र, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त होत आहे. त्यामुळे ओढे नाले खळाळून वाहत असल्याने धरणांत पाण्याची आवक चालू असून सोमवारी सकाळी ४.१२ टीएमसी एवढी नव्याने पाण्याची आवक झाली होती. सध्या धरणांत एकूण १६५.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. यामध्ये उपयुक्त पाणीसाठा १४५.१४ टीएमसी झाला आहे. त्यामुळे खडकवासला, कासारसाई, कळमोडी, चासकमान, आंध्रा, गुंजवणी, वीर, येडगाव, वडज, चिल्हेवाडी, घोड धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

Rain Update
Rain Update:राज्यात हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता

शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील पौड येथे १४ मिलिमीटर पाऊस पडला. घोटावडे येथे १५, माले १७, मुठे २३ मिलिमीटर तर पिरंगूट, थेरगाव भागात तुरळक सरी बरसल्या. भोरमधील भोलावडे येथे २३ मिलिमीटर, नसरापूर १९, वेळू, आंबवडे १२, संगमनेर २२, निगुडघर २०, मावळमधील काले २७, कार्ला २१, खडकाळा १३, लोणावळा ३२, शिवणे ११ वेल्हा तालुक्यातील वेल्हा १४, पाणशेत १३, विंझर १८, आंबवणे १४ मिलिमीटर पाऊस पडला. जुन्नरमधील आपटाळे येथे १७ मिलिमीटर तर जुन्नर, नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, डिंगोरे, ओतूर भागांत हलका पाऊस बरसला. खेडमधील वाडा येथे १२ मिलिमीटर, कडूस १० तर राजगुरुनगर, कुडे, पाईट, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर भागात पावसाचा शिडकावा झाला. आंबेगावमधील आंबेगाव येथे १४ मिलिमीटर तर कळंब, पारगाव, मंचर, घोडेगाव हवेलीतील पुणे वेधशाळा, खडकवासला, भोसरी, चिंचवड, शिरूरमधील वडगाव, न्हावरा, रांजणगाव, पाबळ, बारामतीतील बारामती, माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, इंदापूरातील भिगवण, काटी, निमगाव, अंथुर्णी, सणसर. पुरंदरमधील भिवंडी परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

सोमवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :

तालुका --- पडलेला पाऊस

पुणे शहर --- ०.७५

हवेली -- १.३०

मुळशी -- १३.३३

भोर --- १४.००

मावळ -- १६.४३

वेल्हा -- १४.७५

जुन्नर -- ८.४४

खेड -- ६.००

आंबेगाव -- ५.६०

शिरूर --- ०.७८

बारामती -- १.७५

इंदापूर -- १.००

पुरंदर --- ०.७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com