फेरफार आदालतीत ४३३ प्रकरणे मार्गी

कळंब (ता.आंबेगाव) येथे महसूल व वनविभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘महाराजस्व अभियान’ फेरफार आदालत व महसूल कामकामांसाठी विशेष शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
फेरफार आदालतीत ४३३ प्रकरणे मार्गी
फेरफार अदालत Agrowon

महाळुंगे पडवळ, जि. पुणे ः कळंब (ता.आंबेगाव) येथे महसूल व वनविभागाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘महाराजस्व अभियान’ फेरफार आदालत व महसूल कामकामांसाठी विशेष शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण ४३३ प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

कळंब येथील कमलजादेवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात तहसीलदार रमा जोशी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी मंडल अधिकारी शोभा टिळेकर, नायब तहसीलदार सचिन वाघ, दामुराजे आसवले, आनंता गवारी, लता देवी वाजे, गाव कामगार तलाठी नितीन माने (कळंब), अश्विनी गोरे (महाळुंगे पडवळ), आबासाहेब रुके (रांजणी), सरस्वती पोंदे (चांडोली बुद्रुक), रवींद्र लोंढे (वळती), शुभांगी बिंगोरे, जयश्री भवारी, दामोदर टेमगिरे, रोहिदास सुपे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलियर, नोंदणीकृत फेरफार, प्रलंबित वारस नोंदी, जमिनीचे दावे, ई-पीक पाहणी, तहसीलदार कार्यालयातील प्रकरणे मार्गी लावणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन, अपंग योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, नवमतदार नोंदणी, रेशनिंग कार्ड आदी ४७८ प्रकरणे दाखल झाली होती. त्यापैकी ४३३ प्रकरणे जागेवरच मार्गी लावण्यात आल्याची माहिती मंडल अधिकारी शोभा टिळेकर यांनी दिली. नितीन गायकवाड, कोतवाल गणेश मोरे, शिल्पा विश्वासराव यांनी शिबिराचे संयोजन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com