Rain : वीर धरणच्या पाणलोटक्षेत्रात ४४ मिलिमीटर पाऊस

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने धरणांत पाण्याची आवक कमी झाली होती. त्यातच अधूनमधून ऊन पडत असल्याने शेतामध्ये वाफसा स्थिती तयार झाली आहे.
Veer Dam
Veer DamAgrowon

पुणे : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर (Rain Start In Dam Catchment Area In Pune) धरला आहे. शुक्रवारी (ता.५) सकाळी आठ वाजेपर्यंत वीर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Veer Dam Catchment Area) सर्वाधिक ४४ मिलिमीटर पाऊस (Rain In Pune) पडला. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

Veer Dam
Kharif Sowing: सरासरी पाऊस खरिपासाठी लाभदायक

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने धरणांत पाण्याची आवक कमी झाली होती. त्यातच अधूनमधून ऊन पडत असल्याने शेतामध्ये वाफसा स्थिती तयार झाली आहे. भात पट्ट्यातही लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काही ठिकाणी भात रोपांचे नुकसान झाल्याने लागवडी रेंगाळल्याची स्थिती असून, उसनवारीने रोपे खरेदी करून लागवडी केल्या आहेत.

Veer Dam
Ujani Dam : उजनी धरणाची पाणी पातळी ७० टक्क्यांकडे

यंदा एक जून ते ५ ऑगस्ट या कालावधीत मुळशीच्या घाटमाथ्यावर सर्वाधिक तीन हजार ८१७ मिलिमीटर पाऊस पडला. तर वळवण दोन हजार २७५, लोणावळा २ हजार ६६६, ठोकरवाडी एक हजार ८२१, शिरोटा ९९७ मिलिमीटर पाऊस पडला. याशिवाय टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात एक हजार ८२२ मिलिमीटर वरसगाव एक हजार ४३६, पानशेत एक हजार ४७१, पवना एक हजार ५८५, वडिवळे एक हजार ५७८, कळमोडी एक हजार ८४, गुंजवणी एक हजार ३७२, नीरा देवघर एक हजार २२२ मिलिमीटर पाऊस पडला. तर माणिकडोह ८८४, डिंभे ७५२, भाटघर ५५३, वीर २४१, पिंपळगाव जोगे ७३६, येडगाव ५४६, वडज ४६३, चिल्हेवाडी ४६०, आंध्रा ७७९, कासारसाई ६०५, भामा आसखेड ६१२, चासकमान ५७४, शेटफळ २७३, नाझरे ३४४, वीर २७८, उजनी ३८०, घोड १७६, विसापूर ९५ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे धरणांत चांगलीच आवक झाल्याने जवळपास चार धरणे भरली आहेत. तर काही धरणांत ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला असून ८० टक्क्यांहून अधिक विसर्ग सोडण्यात आला आहे.

शुक्रवारी (ता.५) धरणाच्या पाणलोट क्षेत्रनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

टेमघर ८, वरसगाव ९, पानशेत ११, खडकवासला ५, पवना २, कासारसाई ५, कळमोडी २, चासकमान ४, भामा आसखेड ९, आंध्रा ४, वडिवळे ४, शेटफळ ४, नाझरे २७, गुंजवणी ९, भाटघर ११, नीरा देवघर २, पिंपळगाव जोगे २, माणिकडोह ३, येडगाव १५, वडज, डिंभे ६, चिल्हेवाडी ३१, घोड ८, विसापूर १०, उजनी ३२, मुळशी ३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com