Nagar Mahavitaran : नगर जिल्ह्यात ४४२ कोटीची वीज थकबाकी

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडील थकबाकी महावितरण प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. नगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांची ४४२ कोटी २९ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे.
Electricity
Electricity Agrowon

नगर : महावितरणने (Mahavitaran) मागील वर्षी कृषी वीज थकबाकी (Mahavitaran Due)वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे कृषी वीजबिल थकबाकी मोठ्या प्रमाणात वसूल झाली. मात्र, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडील थकबाकी महावितरण प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. नगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांची ४४२ कोटी २९ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे.

Electricity
Rain Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा ?

स्थानिक स्वराज्य संस्थांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रात पथदिवे लावले जातात. या पथदिव्यांमुळे शहर व ग्रामीण भागापर्यंतचे रस्ते रात्रीच्या वेळी उजळून निघत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था ही वीज महावितरणकडून घेतात. मात्र उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने स्थानिक त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात वीजबिले थकीत आहेत.

Electricity
Rain Update : जायकवडीतून सहा तासात चार वेळा वाढविला विसर्ग

तीन हजार ६३२ ग्राहकांकडे पथदिव्यांच्या वीज बिलाचे ३७४ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी आहे.नगर जिल्ह्यात सर्वांत जास्त थकबाकी पथदिव्यांची आहे. त्याखालोखाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाणीपुरवठा योजनांचा क्रमांक लागतो. एक हजार ग्राहकांकडे पाणीपुरवठा योजनेचे तब्बल ६७ कोटी ८९ लाख रुपयांचे वीजबिल थकबाकी आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांकडे ४४२ कोटी २९ लाख रुपयांची वीजबिले थकीत आहेत. ही थकबाकी घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांच्या थकबाकीपेक्षा खूपच जास्त आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांविरोधात कारवाई करण्यात महावितरणला काही मर्यादा येत आहेत. शिवाय कारवाई केल्यास नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांचा रोषही वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महावितरण प्रशासन कात्रीत सापडले आहे.

जिल्ह्यातील वीजबिल थकबाकी

वीजबिलांची वर्गवारी थकबाकी

घरगुती ४६ कोटी ३५ लाख रु.

वाणिज्य १७ कोटी ७५ लाख रु.

औद्योगिक १३ कोटी ३४ लाख रु.

पथदिवे ३७४ कोटी ४० लाख रु.

पाणीपुरवठा ६७ कोटी ८९ लाख रु.

सार्वजनिक सेवा ४ कोटी ३४ लाख रु.

इतर वर्गवारी ६० लाख

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com