Davos 2023 : राज्यात ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक होणार

दाओसमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
 Davos 2023: investment in Maharashtra
Davos 2023: investment in MaharashtraAgrowon

दाओस : स्वित्झर्लंड येथील दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (World Economic Forum) आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात  ४५,९०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले.

 Davos 2023: investment in Maharashtra
राज्यात ३५ हजार कोटींची गुंतवणूक ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दाओस येथील परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अधिकारी सहभागी झाले आहेत.

सामंत म्हणाले, ``मुख्यमंत्री शिंदे यांनी येथील महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. पहिल्याच दिवशी विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार झाले. या माध्यमातून सुमारे १० हजार रोजगार उपलब्ध होतील.’’

 Davos 2023: investment in Maharashtra
‘टेंभू’ची १ हजार कोटींची कामे लवकरच पूर्ण होणार

असे झाले सामंजस्य करार
  पुणे येथे २५० कोटी रुपये खर्चाचा रूखी फूड्‌सचा ग्रीनफिल्ड अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारणार
 औरंगाबाद येथे १२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्रीनको नवीनीकरण ऊर्जेचा प्रकल्प उभारणार

महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बर्कशायर- हाथवे या उद्योगाच्या १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार  
   

पुण्याजवळ जपानच्या निप्रो कार्पोरेशन या उद्योगाचा १ हजार, ६५० कोटी रुपये गुंतवणुकीचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प उभारण्यात येणार.
   

मुंबई येथे इंड्‌स कॅपिटल पार्टनर्स यांचा १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा प्रकल्प येणार
   बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाबरोबर मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणीसाठी सामंजस्य करार

दाओस येथे पहिल्याच दिवशी ४५ हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकींचे सामंजस्य करार झाल्यामुळे महाराष्ट्रावर उद्योग व गुंतवणूकदारांचा विश्वास सिद्ध झाला आहे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com