Fertilizer : कर्नाटकातील खत कंपनीचा एकाला ४७ लाखाला गंडा

खत कारखान्यामध्ये गुंतवणूक केलेले ४७ लाख रुपये परत दिले नाहीत. त्यामुळे कर्नाटकातील कलबुर्गी येथील भीमा कृष्णा केमिकलचे चेअरमन ईश्‍वर बाळतकर, व्यवस्थापकीय संचालक अनिल कुलकर्णी यांच्यासह नऊ जणांवर सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon

सोलापूर ः खत कारखान्यामध्ये (Fertilizer Company) गुंतवणूक केलेले ४७ लाख रुपये परत दिले नाहीत. त्यामुळे कर्नाटकातील कलबुर्गी येथील भीमा कृष्णा केमिकलचे (Bhima Krushna Chemical) चेअरमन ईश्‍वर बाळतकर, व्यवस्थापकीय संचालक अनिल कुलकर्णी यांच्यासह नऊ जणांवर सोलापुरात गुन्हा दाखल झाला आहे.

Fertilizer
Fertilizer : खतांच्या किंमती आणखी भडकणार

रविकांत भालेराव यांनी या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रेवनसिद्धप्पा ऊर्फ अनिल जवळगी, लक्ष्मण सोनकांबळे, रवी पाटील, दत्ता पाटील, औदुंबर गाफणे, शांता बळवटकर (रा. सर्व कलबुर्गी, कर्नाटक), सिद्धाराम पांढरे (रा. जुळे सोलापूर) यांचा गुन्हा दाखल झालेल्या अन्य संशयितांमध्ये समावेश आहे.

Fertilizer
Fertilizer : खतांच्या किंमती आणखी भडकणार

याबाबत माहिती अशी, की रविकांत विठ्ठल भालेराव (वय ३७, रा. तुलसी विवाह अपार्टमेंट, विजापूर रोड, सोलापूर) यांचा कृषी समृद्धी ॲग्रोटेक फॉर्म नावाचा खतविक्री करण्याचा व्यवसाय आहे. वरील संशयितांनी कलबुर्गी (गुलबर्गा) येथे कंपनी काढू आणि मोठा खतविक्रीचा व्यवसाय करू. त्यातून आपल्याला चांगले पैसे मिळतील, असे आमिष भालेराव यांना दाखवले.

त्यानंतर भालेराव यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतविण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांच्याकडून २९ लाख १९ हजार गुंतवणूक करून घेतले. २०१४ ते २०१८ पर्यंत कंपनीला फायदा झाला. या फायद्यामुळे गुंतवणूक २९ लाखांवरून ४७ लाख रुपये झाली. त्यानंतर भालेराव यांनी कंपनीच्या संचालकांकडे गुंतवलेल्या पैशाची मागणी केली. पण त्यांना पैसे परत मिळाले नाहीत, असे भालेराव यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com