Crop Damage : ऑगस्टमधील नुकसानीचे ४८ टक्के पंचनामे उरकले

मराठवाड्यातील सहा जिल्ह्यात ऑगस्टमध्ये नुकसान झालेल्या १ लाख ३७ हजार १७८ हेक्टर क्षेत्रापैकी ४८.४२ टक्के पंचनामे उरकल्याची माहिती महसूल विभागाच्यावतीने देण्यात आली.
Crop Damage
Crop DamageAgrowon

औरंगाबाद: मराठवाड्यातील सहा जिल्ह्यात ऑगस्टमध्ये नुकसान (Agriculture Damage) झालेल्या १ लाख ३७ हजार १७८ हेक्टर क्षेत्रापैकी ४८.४२ टक्के पंचनामे (Crop Damage Survey) उरकल्याची माहिती महसूल विभागाच्यावतीने (Revenue Department) देण्यात आली.

Crop Damage
Crop Damage : दहा हजार पूर्वसूचनांपैकी केवळ ५३२ पंचनामे

मराठवाड्यात जून, जुलै दरम्यान अतिवृष्टी व पुरामुळे आठ लाख ११ हजार ८४५ शेतकऱ्यांच्या ५ लाख ८७ हजार ४६६ हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त नुकसान झाले होते. या नुकसानीमध्ये ५ लाख ८१ हजर ७८२ हेक्टर जिरायत, पाच हजार ४० हेक्टर बागायत ६४३.५७ हेक्टर फळ पिकांच्या झालेल्या नुकसानीचा समावेश होता. ऑगस्टमध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या सहा जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार ६३७ शेतकऱ्यांच्या १ लाख ३७ हजार १७८ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पुढे आला.

Crop Damage
Crop Damage : अतिवृष्टीने शेतीसह पिकांची दैना

यामध्ये एक लाख छत्तीस हजार ७७७ हेक्टर जिरायत ४०१.४४ हेक्टर बागायत क्षेत्राचा समावेश आहे. झालेल्या नुकसानीच्या एकूण क्षेत्रापैकी ७८ हजार ७६८ शेतकऱ्यांच्या ६६ हजार ४२६ हेक्टरवरील शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे उरकले आहेत. पंचनामे उरकलेल्या क्षेत्रांमध्ये उस्मानाबादमधील ५७ हजार ६४२ हिंगोलीतील ८५११ तर औरंगाबाद मधील २७३ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. प्राथमिक अंदाजाचा क्षेत्रात पंचनामे अंतिम घट व वाढ होणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कृषिमंत्र्यांनी तत्परतेने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या आदेश यंत्रणेला दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर जाहीर मदत तत्परतेने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही कृषिमंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी दौऱ्यात स्पष्ट केले आहे

आजवर २०८ मंडळात अतिवृष्टी

मराठवाड्यातील एकूण ४५० मंडळांपैकी २४ ऑगस्टअखेरपर्यंत २०८ मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील १५, जालन्यातील १९, बीडमधील ८, लातूरमधील २३, उस्मानाबादमधील ११, नांदेडमधील सर्वाधिक ८३, परभणीतील २३ व हिंगोलीतील २६ मंडळांचा समावेश आहे. अतिवृष्टी झालेल्या मंडळांपैकी १०४ मंडळात एक वेळा, ५१ मंडळात दोन वेळा, ३३ मंडळात तीन वेळा, १५ मंडळात चार वेळा, ३ मंडळात पाच वेळा तर २ मंडळात सहा वेळा अतिवृष्टी झाल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com