धरणांत ४.८० टीएमसी पाण्याची आवक

: जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे. मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक २६८ मिलिमीटर पाऊस पडला.
Rain Update
Rain Update Agrowon

पुणे : जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा पुन्हा जोर (Rain Intensity Incresed In Oune District's Dam Are) वाढला आहे. मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक २६८ मिलिमीटर पाऊस पडला. मंगळवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यातील एकूण २६ धरणांमध्ये ४.८० टीएमसी एवढी नव्याने पाण्याची आवक (Water Inflow) झाली आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याच्या पातळीत (Dama Water Level) वाढ होण्यास मदत झाली आहे.

Rain Update
Ujani Dam : उजनी यंदा बारा दिवस आधीच ५० टक्क्यांवर भरले

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवस पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. चालू महिन्यात दोन ऑगस्ट रोजी धरणातील पाण्याच्या आवकेत एक टीएमसीहून कमी घट झाली होती. त्यानंतर ३ ऑगस्ट (बुधवारी) रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत धरणांत ०.५८ टीएमसी एवढी घट झाली. परंतु चार ऑगस्टपासून पुन्हा पावसास सुरुवात झाल्याने धरणांत पाण्याच्या आवकेत वाढ होण्यास सुरुवात झाली. गुरुवारी (ता. ४) रोजी धरणांत ०.९१ टीएमसी वाढ झाली. तर, शुक्रवारपासून (ता. ५) बऱ्यापैकी पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Rain Update
Agriculture Advisory : कृषी सल्ला (कोकण विभाग)

गेल्या चोवीस तासांमध्ये मुठा खोऱ्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी-अधिक होता. त्यामुळे टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांत नव्याने १.१६ टीएमसी एवढ्या नव्याने पाणीसाठ्याची आवक झाली आहे. नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रातही पावसाचा जोर बऱ्यापैकी होता. त्यामुळे पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडिवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर आणि वीर धरणांत १.६३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. कुकडी खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी होता. त्यामुळे पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, घोड, चिल्हेवाडी या धरणांत नव्याने ०.९० टीएमसी, तर मुळशी धरणांमध्ये ०.९७ टीएमसी एवढा नव्याने पाणीसाठा दाखल झाला आहे.

मंगळवारी (ता.९) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाणलोट क्षेत्रातील पाऊस, (मिलिमीटरमध्ये)

टेमघर १२५, वरसगाव ७६, पानशेत ७५, खडकवासला ६, पवना ५२, कासारसाई ३०, कळमोडी २६, चासकमान ७, भामा आसखेड १७, आंध्रा २४, वडिवळे ५३, शेटफळ ४, नाझरे ४, गुंजवणी ६३, भाटघर २९, नीरा देवघर ७३, वीर ५, पिंपळगाव जोगे ६, माणिकडोह २२, येडगाव २१, वडज २०, डिंभे ७, चिल्हेवाडी ८, घोड ८, विसापूर ४, उजनी ३, मुळशी २६८.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com