
उत्तूर, जि. कोल्हापूर (Kolhapur News): महागोंड (ता. आजरा) परिसरात ४८४ एकर जमीन लवकरच ओलिताखाली येणार आहे. यासाठी महागोंड, महागोंडवाडी, होन्याळी येथे तीन सहकारी पाणी संस्था (Cooperative Water Society) स्थापन झाल्या आहेत.
आंबेओहळ धरणातील (Ambeohal Dam) उपलब्ध पाण्याचे सुनियोजित वाटप सहकारी पाणीवाटप संस्थांच्या माध्यमातून होईल. विशेषत: शेतीसाठी राखून ठेवलेल्या पाण्याच्या वाटपात या संस्था एक चांगले माध्यम ठरणार आहेत.
दोन वर्षांपूर्वी आरदाळ-पास्टेवाडीदरम्यान एक टीएमसीचा आंबेओहळ प्रकल्प साकारला. गेली दोन वर्षे पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प भरला आहे. या पाण्याचा शेतीसाठी वापर व्हावा, यासाठी जलसिंचन विभागाने १८ गावांत ७४ पाणी परवाने दिले.
यापैकी महागोंड परिसरात श्री बाळोबा देव सहकारी पाणीपुरवठा संस्था (महागोंड), श्री दत्त सहकारी पाणीपुरवठा संस्था (महागोंडवाडी), श्री बळीराजा सहकारी पाणीपुरवठा (होन्याळी) या तीन सहकारी संस्थांना परवाना मिळाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.