कार्ल्यातील ५० शेतकऱ्यांनी केले मातीचे परीक्षण

कृषी विभागाच्या वतीने मावळ तालुक्यातील कार्ला गावातील पन्नास शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करण्यात आले.
Soil Testing
Soil TestingAgrowon

पुणे : कृषी विभागाच्या वतीने मावळ तालुक्यातील कार्ला गावातील पन्नास शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे परीक्षण करण्यात आले. फिरती माती परीक्षण प्रयोगशाळा कार्ला गावात आली असता हे परीक्षण करण्यात आले.

या फिरत्या प्रयोगशाळेत परीक्षणासाठी आलेल्या मातीचे परीक्षण करणार असून, मातीनुसार कोणते पीक घेतले जावे तसेच कोणते खत वापरण्यात यावे. याची माहिती मृदा शास्त्रज्ञ योगेश यादव, उद्यान मृदा शास्त्रज्ञ भरत टेमघर, कृषी अधिकारी संताजी जाधव, कृषी विस्तार अधिकारी निकेतन धावटे, कृषी सहायक प्रतीक हंडाळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर माहिती दिली. या वेळी कार्ला सरपंच दीपाली हुलावळे, उपसरपंच किरण हुलावळे, सदस्य अभिषेक जाधव, सचिन हुलावळे, सनी हुलावळे, सदस्या भारती मोरे, उज्ज्वला गायकवाड, वत्सला हुलावळे, सोनाली मोरे, ग्रामसेवक सुभाष धोत्रे व काल गावातील शेतकरी उपस्थित होते. संतोष मोरे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com