अकोल्यातील मोठे प्रकल्प जुलैतच ५० टक्क्यांवर

जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघू प्रकल्प यंदा जोरदार पावसामुळे बऱ्यापैकी साठा निर्माण झाला आहे. यात प्रामुख्याने काटेपूर्णा, वाणसांरख्या प्रकल्पांचा समावेश आहे.
Akola
Akola Agrowon

अकोला ः जिल्ह्यातील मोठे, मध्यम तसेच लघू प्रकल्प (Water Project In Akola) यंदा जोरदार पावसामुळे (Heavy rain Aakola) बऱ्यापैकी साठा (Water Storage) निर्माण झाला आहे. यात प्रामुख्याने काटेपूर्णा, वाणसांरख्या प्रकल्पांचा समावेश आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्यात संततधार पाऊस झालेला आहे. प्रामुख्याने मोठ्या प्रकल्पाच्या क्षेत्रात हा पाऊस पडल्याने साठा वाढला. सध्या काटेपूर्णा या प्रकल्पात ५२.०७ दलघमी साठा झालेला आहे. एकूण क्षमतेच्या ६०.३ टक्के एवढा हा साठा आहे. वाण प्रकल्पातही ५१.५७ दलघमी साठा असून ६२.९३ टक्के एवढा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्प ५० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यात सध्या ३३.४६ दलघमी साठा आहे. खडकपूर्णा प्रकल्पात ३७.४ दलघमी साठा झालेला आहे. पेनटाकळी प्रकल्पात ४१.७३ दलघमी म्हणजेच ६९.५७ टक्के साठा आहे.

Akola
Soybean Sowing : अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी अव्वल

जिल्ह्यात गेल्या काळात सलग दहा ते बारा दिवसांपर्यंत संततधार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात पाणीसाठा वाढला. जिल्ह्यातील लहान व मोठ्या सिंचन प्रकल्पात ६० टक्क्यांवर पाणी जमा झाले आहे. यंदा जुलैतच हे प्रकल्प एवढे भरल्याने असाच पाऊस होत राहिल्यास पुढील महिन्यातच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.

Akola
अकोला जिल्ह्यात कृषी व्यावसायिकांचा बंद

यावर्षी जिल्ह्यात पावसाने उशिरा हजेरी लावली. सुरुवातीच्या काळात अधूनमधून पाऊस झाला. परंतु त्यानंतर मात्र जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातसुद्धा गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात सुद्धा चांगले पाणी संग्रहित होत आहे. जुलै महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सध्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात ६० टक्क्यांवर पाणी जमा झाले आहे. दरम्यान, सध्या पावसाळ्याचे जवळपास ६० दिवस शिल्लक असल्याने पुढील काही दिवसात असाच पाऊस होत राहिल्यास सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरण्याची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com