Yavatmal News : यवतमाळला ५०० ग्रामपंचायतींनी धुडकावला शासनाचा अल्टिमेटम

एक हजार २०७ ग्रामपंचायतींना सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांतील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे लेखे संकलन अंतर्गत उत्पन्न व खर्चाची माहिती ऑनलाइन करण्याचे आदेश होते.
Gram Panchayat
Gram PanchayatAgrowon

यवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना उत्पन्न (Income Grampanchayat) आणि खर्चाची माहिती ऑनलाइन (Online information) करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते.

मुदत संपूनही या वर्षातील ५२६ ग्रामपंचायतींनी माहिती सादर केलेली नाही. विशेष म्हणजे सन २०२०-२१मधील ५८५ ग्रामपंचायतींनी (Grampanchyat) माहिती भरण्याकडे काणाडोळा केला आहे.

एक हजार २०७ ग्रामपंचायतींना सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षांतील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे लेखे संकलन अंतर्गत उत्पन्न व खर्चाची माहिती ऑनलाइन करण्याचे आदेश होते.

ग्रामपंचायतींना हिवाळी अधिवेशनापर्यंत माहिती ऑनलाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही ग्रामपंचायतींनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

सन २०२०-२१मध्ये ६२२ ग्रामपंचायतींनी ऑनलाइन माहिती भरली आहे. ३९३ कामांची माहिती भरणे सुरू असल्याचे सांगितले जात आहे. १९२ ग्रामपंचायतींनी उत्पन्न व खर्चाची माहितीच उपलब्ध करून दिलेली नाही.

४०५ ग्रामपंचायतींची माहिती ऑनलाइन करण्यात आली असून, ६८० ग्रामपंचायतींचा डेटाएन्ट्रीचे काम प्रगतिपथावर आहे.

१२२ ग्रामपंचायतींनी माहितीच उपलब्ध करून दिलेली नाही. पंचायत विभागाने सर्व ग्रामपंचायतींना उत्पन्न व खर्चाची माहिती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही पंचायत विभागाने आदेश धुडकावले आहेत.

Gram Panchayat
Gram Panchayat Election : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध

बाभूळगाव तालुका आघाडीवर

शासनाच्या आदेशानुसार २०२१-२२मधील कामाला सुरुवात झाली. त्यात आतापर्यंत ३३.५५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. बाभूळगाव तालुक्याने सर्वाधिक ९६.८८ टक्के काम पूर्ण केले आहे.

नेर ९४.१२, कळंब ८३.६१, यवतमाळ ९.५७, दारव्हा १७.४४, पुसद २४.३७, उमरखेड ६.५२, महागाव ७.७९, आर्णी १०.३९, घाटंजी ११.२७, केळापूर १७.५७, राळेगाव ६८.९२, महारेगाव ८१.०३, झरी जामणी ९.०९, वणी तालुक्यात ४४ टक्के काम झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com