Gujarat Election : गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी दुपारपर्यंत ५०.५१ टक्के मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सोमवारी (ता. ५) दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ५०.५१ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली असून उत्तर आणि मध्य विभागातील १४ जिल्ह्यांमधील ९३ जागांसाठी मतदान झाले, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
Gujarat Election
Gujarat ElectionAgrowon

अहमदाबाद (वृत्तसंस्था) ः गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Election) दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सोमवारी (ता. ५) दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ५०.५१ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली असून उत्तर आणि मध्य विभागातील १४ जिल्ह्यांमधील ९३ जागांसाठी मतदान झाले, असे निवडणूक आयोगाने (Election Commission) म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदान गढवी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुखराम रथवा यांनी मतदान केले. राज्यातील १४,९७५ मतदान केंद्रांवर सकाळी ८ वाजता मतदान सुरू झाले. दुसऱ्या टप्प्यात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि २८५ अपक्षांसह ८३२ अन्य उमेदवारांचे भवितव्य ठरवले जाणार आहे.

Gujarat Election
Gujarat Election : गुजरात निवडणुकीमुळे संसदेच्या अधिवेशनाचा मुहूर्त पुढे

दुपारी १ वाजेपर्यंत साबरकांठा जिल्ह्यात सर्वाधिक ५७.२३ टक्के मतदान झाले, त्यानंतर बनासकांठा जिल्ह्यात ५५.५२ टक्के मतदान झाले. अहमदाबाद जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४४.६७ टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या अपडेटनुसार वडोदरामध्ये ते ४९.६९ टक्के होते.

Gujarat Election
Gujarat Election : मोदी-शहांच्या प्रतिष्ठेचा सामना

मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन तासांत ४१ बॅलेट युनिट्स, ४० कंट्रोल युनिट्स आणि १०९ व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल्स (व्हीव्हीपॅट्स) खराब झाल्यामुळे बदलण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अहमदाबाद शहरातील राणीप भागातील निशान हायस्कूल येथील मतदान केंद्रावर पंतप्रधान मोदींनी सकाळी आपल्या लोकशाही अधिकाराचा वापर केला. त्यांची आई हिराबा यांनी गांधीनगर जिल्ह्यातील एका केंद्रावर मतदान केले. केंद्रीय मंत्री शाह यांनी अहमदाबाद शहरातील नारनपुरा परिसरातील महापालिका केंद्रात मतदान केले.

इसुदान गढवी यांनी अहमदाबादमधील घुमा भागातील एका बूथवर मतदान केले. देवभूमी द्वारका जिल्ह्यातील खंभालिया मतदारसंघातील ते आपचे उमेदवार आहेत जेथे १ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी एकूण २.५१ कोटी मतदार मतदानासाठी पात्र आहेत, त्यात १.२९ कोटी पुरुष आणि १.२२ कोटी महिलांचा समावेश आहे. गुजरातमधील विधानसभेच्या एकूण १८२ जागांपैकी ८९ जागांसाठी १ डिसेंबर रोजी मतदान झाले आणि सरासरी ६३.३१ टक्के मतदान झाले. सर्व जागांची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com