Dam Intake : धरणांत ५२६ टीएमसी पाण्याची आवक

पुणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने धरणक्षेत्रांत पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यंदा पावसाळ्यात ५२६.५२ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यापैकी एकूण २६ धरणांत २००.८४ टीएमसी एवढा उपयुक्त पाण्याचा साठा झाला आहे.
Mulshi Dam
Mulshi DamAgrowon

पुणे : पावसाळ्याचे जवळपास चार महिने संपत आले आहेत. या कालावधीत पुणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी (Heavy Rainfall) लावली असल्याने धरणक्षेत्रांत (Dam Area) पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. यंदा पावसाळ्यात ५२६.५२ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. त्यापैकी एकूण २६ धरणांत २००.८४ टीएमसी एवढा उपयुक्त पाण्याचा साठा झाला आहे. तर, उर्वरित पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

Mulshi Dam
Ujani Dam : उजनीतून भीमा नदीत सोडलेला विसर्ग बंद

गेल्या पंधरवड्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. मात्र, पुन्हा पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याने धरणक्षेत्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. धरणांत पुन्हा पाण्याची आवक सुरू झाली असल्याने अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

Mulshi Dam
Jayakwadi Dam : जायकवाडीतून ६६५२४ क्युसेकने विसर्ग सुरू

चालू वर्षी पुणे जिल्ह्यात उशिराने पावसाला सुरुवात झाली. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे धरणांतील पाण्याची पातळी वेगाने वाढली. त्यातच नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहत असल्याने काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा या घाटमाथ्यांवर मुसळधार पाऊस बरसला. यंदा लोणावळा चार हजार ६३०, वळवण ३ हजार ९२४, ठोकरवाडी २ हजार ९६२, शिरोटा २ हजार २९१ मिलिमीटर पाऊस पडला.

यंदा टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक ३ हजार ४२५ मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या वर्षी या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २ हजार ९६६ मिलिमीटर पाऊस पडला होता. याशिवाय वडिवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन हजार ७७१ मिलिमीटर, पवना धरणात दोन हजार ६३१ मिलिमीटर, पानशेत दोन हजार ५२४ मिलिमीटर, वरसगाव २ हजार ५२०, गुंजवणी दोन हजार ५११,

नीरा देवघर दोन हजार २६८, कासारसाई एक हजार १५६, कळमोडी एक हजार ७३१, भामा आसखेड एक हजार १५१, आंध्रा धरणात एक हजार ५०४, पिंपळगाव जोगे एक हजार २१०, माणिकडोह एक हजार ४१४, येडगाव एक हजार १८८, डिंभे एक हजार ३६२ मिलिमीटर पाऊस पडला.

तर, खडकवासला, चासकमान, शेटफळ, नाझरे, भाटघर, वीर, वडज, चिल्हेवाडी,घोड, विसापूर, उजनी या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात एक हजार मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडला आहे. विसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वांत कमी पाऊस पडल्याची नोंद झाली.

‘मुळशी’घाटमाथ्यावर ७,४२१ मिमी पाऊस

यंदा एक जूनपासून ते २६ सप्टेंबर या कालावधीत मुळशी धरणांच्या घाटमाथ्यावर सर्वाधिक ७ हजार ४२१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. गेल्या वर्षी याच काळात घाटमाथ्यावर ६ हजार ३०० मिलिमीटर पाऊस पडला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com