Cashew Crop : काजू विकासासाठी ५३ कोटींचा आराखडा

Cashew Market : काजूच्या सर्वंकष विकासासाठी काजू फळपिक विकास योजना लागू केली असून, त्यात रत्नागिरीसह कोकणातील पाच जिल्हे आणि चंदगड, आजरा हे कोल्हापूरमधील दोन तालुके समाविष्ट आहेत.
Cashew Crop
Cashew CropAgrowon

Ratnagiri News : काजूच्या सर्वंकष विकासासाठी काजू फळपिक विकास योजना लागू केली असून, त्यात रत्नागिरीसह कोकणातील पाच जिल्हे आणि चंदगड, आजरा हे कोल्हापूरमधील दोन तालुके समाविष्ट आहेत.

२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा ५३ कोटीचा आराखडा तयार झाला आहे. यामध्ये सर्वाधिक निधी जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवनासाठी साडेसोळा कोटी रुपये ठेवण्यात आला असून, ४५ हजार ४७८ जणांना लाभ दिला जाणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेमार्फत खासगी क्षेत्रातील रोपवाटिका स्थापन व बळकटीकरणासाठी अनुदान किमान ५० गुंठे ते जास्तीत जास्त १ हेक्टर क्षेत्र अनुदान रु. ७ लाख ५० हजार प्लॅस्टिक आच्छादनासह शेततळे सुविधासाठी अनुदान प्लास्टिक आच्छादन रु. ७५ हजार देण्यात येते. काजू योजनेअंतर्गत जिल्ह्याचा आराखडा कृषी विभागाकडून तयार करण्यात आला आहे.

Cashew Crop
Cashew Production : काजू फळपीक विकास योजनेचा लाभ घ्या

यामध्ये रोपवाटिकेसाठी ६० लाख रुपये, काजू कलमांसाठी २ कोटी २५ लाख, प्लॅस्टिक आच्छादनासह शेततळे ९३ लाख ७५ हजार, सिंचनाकरिता विहीर ६ कोटी २५ लाख, टीमॉस्किटो नियंत्रणाकरिता पीकसंरक्षण ५ कोटी ५९ लाख, काजूबागेमधील तणनियंत्रण ३ कोटी, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन १६ कोटी ५० लाख, काजू तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण १ कोटी ५० लाख, काजूप्रक्रिया उद्योग आधुनिकीकरण ४ कोटी १ लाख, पॅकहाऊस व ड्रॉइंग यार्ड ९ कोटी, काजू बोंडावर प्रक्रियेकरिता ३ कोटी आणि ओले काजूगर काढणी व प्रक्रियेसाठी १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Cashew Crop
Cashew Processing : आधुनिक तंत्राच्या सहाय्याने तरूणाची काजू प्रक्रिया उद्योगात भरारी

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी महाटीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावयाचे आहेत. हा महा ई-सेवा केंद्र किंवा कृषी विभागाच्या तालुकास्तरीय कार्यालयातून करता येतील. त्यासाठी अर्जासोबत सातबारा, ८ अ, बॅंकपासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, आधारकार्ड इ. कागदपत्रे जोडून अर्ज ऑनलाईन करायचा आहे.

योजनेतून मिळणारे अनुदान

  • सिंचनाकरिता विहीर २ लाख ५० हजार

  • कृषी यांत्रिकीकरण योजना १८ हजार प्रतियुनिट

  • फलोत्पादन विकास अभियान ५० टक्के व २० हजार प्रति हेक्टर

  • कृषी व अन्नप्रक्रिया कमाल १० लाख

  • पॅकहाउस व ड्रॉईंग यार्ड १० लाख

  • तालुका भौतिक लक्ष निधी (रु.)

  • मंडणगड ५०२३ ५ कोटी ५१ लाख

  • दापोली ५०५४ ६ कोटी ८९ लाख

  • खेड ५०४० ५ कोटी ७१ लाख

  • गुहागर ५०३९ ५ कोटी ६४ लाख

  • चिपळूण ५०४० ५ कोटी ७१ लाख

  • संगमेश्वर ५०५० ५ कोटी ७१ लाख

  • रत्नागिरी ५११७ ६ कोटी ३७ लाख

  • लांजा ५०६३ ६ कोटी ३३ लाख

  • राजापूर ५०५२ ५ कोटी ७३ लाख

काजू लागवडीसह प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी शासनाने ही योजना लागू केली आहे. याचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा. काजू बी बरोबर बोंडावरील प्रक्रियेलाही चालना दिली गेली आहे.
- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com