
लातूर, ता. २७ ः लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ४९ गावातील ९३ किलोमीटर लांबीच्या ५३ शेत व पाणंद रस्त्याच्या (Panand Roads) कामाला राज्य शासनाने मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेतून मंजुरी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड (Ramesh Karad) यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
लातूर ग्रामीणमध्ये अनेक गावच्या शेत रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी शेत रस्तेच नसल्याने त्याचा शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हे अडचण लक्षात घेवून आमदार कराड यांनी या शेत रस्त्यांच्या कामांना मान्यता मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून शासनाने लातूर ग्रामीण मतदार संघातील ४९ गावातील शेत रस्त्यांना मंजुरी दिली आहे. त्यात लातूर तालुक्यातील २५ गावात ४४ किलोमीटर, रेणापूर तालुक्यातील १५ गावात ३१ किलोमीटर आणि भादा सर्कल मधील ८ गावात १८ किलोमीटर रस्त्याच्या कामाचा समावेश आहे.
लातूर तालुक्यातील खुंटेफळ, रामेश्वर, सामनगाव, गातेगाव, तांदुळवाडी, काटगाव, कासार जवळा, भातांगळी, मुरुड, गुंफावाडी, चिंचोली, कासारखेडा, बोडका, दिंडेगाव, मसला, शिराळा, रुई, सारसा, भोईसमुद्रगा, कोळपा, ढोकी, रामेगाव, भडी, टाकळी शि., ममदापूर, रेणापूर तालुक्यातील पानगाव, फरदपूर, वाला, गरसुळी, मोरवड, बिटरगाव, भोकरंबा, मुरढव, कुंभारवाडी, तळणी, मोहगाव, नरवटवाडी, मुसळेवाडी, रामवाडी ख., कारेपूर आणि भादा सर्कल मधील उटी बु. , सिंदाळा, भेटा, सत्तरधरवाडी, टाका, कवठा केज, काळमाथा, वरवडा, येल्लोरीवाडी या गावांत शेतरस्ते होणार आहेत.
या कामासाठी केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून निधी उपलब्ध होणार आहे. ही सर्व कामे २०२२-२३ या आर्थिक वर्षात सुरू करण्याच्या अटीवर शासनाने मंजुरी दिली आहे. उर्वरित प्रस्तावित केलेल्या कामांना येत्या पंधरा दिवसात राज्य शासनाकडून मंजुरी मिळणार आहे, अशी माहिती आमदार कराड यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.