Crop Damage Survey : नुकसानग्रस्त क्षेत्रापैकी ५६ टक्के पंचनामे पूर्ण

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात १ ते २० मार्च दरम्यान अवेळी पाऊस व गारपिटीमुळे १ लाख ६८ हजार २६२ शेतकऱ्यांच्या १ लाख ३ हजार ६४९.२८ हेक्टर क्षेत्रावरील शेती पीक बाधित झाली होती.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Unseasonal Rain Crop Damage छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपिटीने (Hailstorm) नुकसान (Crop Damage) झालेल्या क्षेत्रापैकी ५६ टक्के क्षेत्रावरील पंचनाम्याचे काम २४ मार्चपर्यंत पूर्ण झाल्याची माहिती विभागीय महसूल प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात १ ते २० मार्च दरम्यान अवेळी पाऊस व गारपिटीमुळे १ लाख ६८ हजार २६२ शेतकऱ्यांच्या १ लाख ३ हजार ६४९.२८ हेक्टर क्षेत्रावरील शेती पीक बाधित झाली होती. त्यामध्ये ४५ हजार ६२६.८० हेक्टरवरील जिरायत, ५१ हजार ४९४.७८ हेक्टरवरील बागायत व ६५२७.७० हेक्टरवरील फळ पिकांचा समावेश होता.

Crop Damage
Crop Damage Survey : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

नुकसान झालेल्या या एकूण क्षेत्रापैकी ५८ हजार ४.५८ हेक्टरवरील म्हणजे एकूण क्षेत्राच्या तुलनेत ५५.९६ टक्के शेती पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

Crop Damage
Hailstorm Crop Damage : गारपीटग्रस्तांचा प्रश्न लोकसभेत मांडणार : विनायक राऊत

त्यामध्ये २४ हजार ७३७.१५ हेक्टरवरील जिरायत २९ हजार १२०.१८ हेक्टरवरील बागायत तर ४१४६.९५ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झालेल्या फळपिकांचा समावेश असल्याचे महसूल विभागाकडून कळविण्यात आले आहे.

जिल्हानिहाय नुकसानग्रस्त शेतकरी व बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा शेतकरी बाधित क्षेत्र

छ. संभाजीनगर ४९११८ १९३८२.८१

जालना ११६३४ १५०९४.१७

परभणी ९१९१ ५९९८.९०

हिंगोली १३२८६ ५६०४

नांदेड ३३६२६ २४६१३

बीड २९०५८ १९०९०

लातूर १९८७७ १२३४०

धाराशिव २४७२ १५२५.९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com