E Pik Pahani : खरीप ‘ई-पीकपाहणी’मध्ये ५९ लाख शेतकरी सहभागी

रब्बीसाठी ३१ जानेवारीपर्यंत सुविधा उपलब्ध
E Peek Pahani
E Peek PahaniAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः राज्यातील ५९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी यंदा खरीप ई-पीकपाहणी (Kharif E Pik Pahani) केली आहे. आता रब्बी हंगामाची (Rabi Season) सुविधाही भ्रमणध्वनी उपयोजनात (मोबाईल अॅप) उपलब्ध झाली आहे. ही सुविधा ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

E Peek Pahani
Crop Insurance : जव्हारमध्ये ई-पीकपाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

यापूर्वीच्या हंगामात शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी केल्यानंतर तलाठ्याने मंजुरी दिल्याशिवाय सातबारावर पिकाची नोंद होत नव्हती. मात्र शासनाने आता शेतकऱ्यांच्या नोंदींवर पूर्ण विश्‍वास दाखवत तलाठ्यांचा हस्तक्षेप हटविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पाहणी शासनाच्या संगणकीय प्रणालीत आपोआप केली जात आहे. यामुळे यंदा खरिपात ५९ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी स्वतःहून मोबाईलच्या माध्यमातून एक कोटी ४१ लाख हेक्टरवरपैकी ८१ लाख ५८ हजार हेक्टरवरील पीकपाहणी पूर्ण केली.

E Peek Pahani
वीस हजार हेक्टर क्षेत्राची  ई-पीकपाहणी परभणीत मंजूर 

‘‘यंदा अतिपावसामुळे शेतकरी विविध समस्यांना तोंड देत होते. तरीही १५ ऑगस्टपासून आतापर्यंत ५७ लाख शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी यशस्वीपणे पूर्ण केली. यात औरंगाबाद विभाग आघाडीवर होता. आतापर्यंत राज्यातील एक कोटी २२ लाख शेतकऱ्यांनी गुगलच्या अॅप स्टोअरवर जाऊन ई-पीकपाहणीचे उपयोजन वापरले आहे. खरिपाच्या पीकपाहणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंतच मुदत होती. मात्र जमाबंदी आयुक्तांनी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

E Peek Pahani
Government Scheme : शेतकरी सन्मान योजनेसाठी पाच लाख ई-केवायसी पूर्ण

शेतकऱ्यांनी केलेल्या खरीप हंगामातील ई-पीकपाहणीत नाशिक विभागातील शेतकरी आघाडीवर आहेत. तेथे साडेबारा लाख शेतकऱ्यांनी ७५ टक्क्यांपर्यंत पीकपाहणी मोबाईलमुळे केली आहे. औरंगाबाद विभागात दुष्काळी जिल्हे सर्वांत जास्त असतानाही खरिपाच्या ४८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २७ लाख हेक्टरच्या पुढे ई-पीकपाहणी पूर्ण करीत शेतकऱ्यांनी आपले कसब दाखवून दिले आहे. राज्यात खरिपात झालेल्या ई-पीकपाहणी सर्वाधिक नोंद झालेली पाच प्रमुख पिके व त्यांचे क्षेत्र असे ः सोयाबीन ३१,२३,६२३ हेक्टर, कापूस १४,८९,८४७ हेक्टर, भात ७,९७,७७६ हेक्टर, तूर ३,२१,७२० हेक्टर, मका २,८४,६५३ हेक्टर.

राज्यातील ५९ लाख शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी यशस्वीपणे केली आहे. आता शेतकऱ्यांसाठी खरिपासाठी सुविधा बंद करण्यात आली आहे. मात्र तलाठ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत नोंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या भागात पीकपाहणी राहून गेली असल्यास शेतकरी आपापल्या गावातील तलाठ्याशी संपर्क करून पिकाची नोंद करू शकतात.
- श्रीरंग तांबे, राज्य समन्वयक, ई-पीकपाहणी प्रकल्प

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com