
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या (Kolhapur ZP) सर्वसाधारण सभेत ६० कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली. सोमवारी (ता. ९) प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यामध्ये बांधकाम विभागांतर्गत प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतील कामांची संख्या मोठी आहे. जिल्हा नियोजनच्या कामांबाबत (District Planning Work) प्रस्ताव सादर झाले असले तरी अद्याप त्यांना मंजुरी मिळालेली नाही.
सर्वसाधारण सभेसमोर ४५ विषय होते. यातील १५ विषय बांधकाम विभागाच्या मान्यतेसंदर्भात होते. या पाठोपाठ आरोग्य, ग्रामपंचायत, शिक्षण विभागांच्या कामांचा समावेश होता. कृषी विभागाच्या सेसमधून ५० टक्के अनुदानावर इलेक्ट्रिक मोटर इंजिनसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
याचबरोबर जिल्ह्यातील १६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील शवविच्छेदन रूमची दुरुस्ती व विस्तारीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. रोजगार हमीच्या सुधारित आराखड्यासही मान्यता देण्यात आली आहे. मागासवर्गीय वस्तीमध्ये पुन्हा एलईडी बसवण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात मोक्याच्या ठिकाणी जि.प.च्या मालकीच्या जागा आहेत. त्या विनावापर पडून आहेत. तेथे व्यावसायिक गाळे बांधणे, इमारतींसाठी वास्तुविशारद तथा तांत्रिक सल्लागार नेमण्यासाठी अटीशर्ती करण्यास सभेने मान्यता दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.