Potkharaba Land : ६० हजार एकर पोटखराब क्षेत्र लागवडीखाली ; पुणे जिल्हा राज्यात अग्रेसर

राज्यातील लागवडी अयोग्य क्षेत्र लागवडीखाली आणण्यासाठी राज्य सरकार विशेष मोहिम राबवत आहे.
Potkharab Land
Potkharab LandAgrowon

Pune Agriculture News : राज्यातील लागवडी अयोग्य क्षेत्र (Barren Land) लागवडीखाली आणण्यासाठी राज्य सरकार विशेष मोहिम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील ६० हजार एकर पोटखराब क्षेत्र (Potkharab Land) लागवडीखाली आणण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांकाची कामिगरी केली आहे.

राज्य सरकारने महसूल विभागाला दिलेल्या ‘महत्वाची फलनिष्पत्ती क्षेत्रा’मधील एक क्षेत्र हे जिल्ह्यातील पोटखराब असलेले क्षेत्र लागवड योग्य करुन लागवडीखाली आणणे हे आहे. या अनुषंगाने २०२२ - २०२३ मध्ये या मोहिमेमध्ये जिल्ह्यात अतिशय काटेकोर नियोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यात पोटखराब ‘अ’ क्षेत्र म्हणजे केवळ कृषी कारणांसाठी अयोग्य असलेली जमीन जवळ जवळ १ लाख ३७ हजार ९१७ हे. आर असून त्यापैकी डोंगराळ, तीव्र उताराचे, खडकाळ असे क्षेत्र वगळून उर्वरित पैकी किमान ५० हजार एकर क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे नियोजन करण्यात आले.

Potkharab Land
Land Acquisition Compensation : जमिनीच्या मोबदल्याची १५ वर्षांपासून प्रतीक्षा

याबाबत जमाबंदी आयुक्त यांच्याकडून ऑगस्ट २०१९ मध्ये सविस्तर सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होवून मोहिमेचा लाभ घ्यावा, यासाठी अशी जमीन लागवडीखाली आणण्याचे अधिकार त्या त्या उपविभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना सप्टेंबर २०२१ मध्ये कोरोना कालावधी संपल्यानंतर देण्यात आले.

यामध्ये पुणे जिल्ह्यातील कामगार तलाठ्यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या पोटखराबा क्षेत्राची पाहणी केली. याबाबतचा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांनी तहसिलदारांना सादर केला.

संबंधित अहवालाच्या आधारे तहसिलदारांनी उपअधिक्षक भूमी अभिलेख यांचा अहवाल घेऊन आकारणीसह आदेशाकरिता संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी यथोचित तपासणी करुन आदेश करण्याची कार्यवाही पूर्ण केली.

Potkharab Land
Potkharab Land : पोटखराब क्षेत्र कमी करावे

पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे जमीन महसूलात वाढ झाली आहे. लागवडीयोग्य पिकाखालील क्षेत्रात वाढ झालेली आहे.

उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. शेतकऱ्यांना या क्षेत्रात नाममात्र सुधारणा करुन जास्त पिके घेता येणार आहे. जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रात वाढ होऊन एकूण कृषी उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली आहे.

शेतकऱ्यांना पीक कर्ज काढताना या क्षेत्राची गणना होणार असून जमीन विकताना अथवा शासकीय प्रयोजनासाठी गेल्यास मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ होणार आहे.

मुळशी तालुक्याची चांगली कामगिरी

मोहिमेअंतर्गत मुळेशी तालुक्याने सर्वाधिक ५३४२.२९ हे.आर पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणले आहे. त्या खालोखाल मावळ ४१२६.२६, पुरंदर ३४८५.५१, दौंड ३३८२.३३, भोर २५३६.९३, खेड १८३२.२४, शिरुर १४६२.२६, हवेली ६४८.५३, बारामती ४४४, इंदापुर ४२३.६०, जुन्नर २०१.१०, आंबेगाव ६४.०२, वेल्हे २७.७४ आणि अपर हवेली तह. पि.चिं.मध्ये ५.३६ हे. आर पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आले आहे.

या मोहिमेत तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार, उप अधिक्षक भूमी अभिलेख यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नियोजनद्ध कामकाज करुन ६० हजार एकर क्षेत्र लागवडयोग्य केले आहे.

उर्वरित क्षेत्रापैकी लागवडीखाली आणण्यायोग्य क्षेत्र लागवडयोग्य होईपर्यंत ही मोहिम सुरु राहणार राहील, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com