MSE Bank : राज्य शिखर बॅंकेला ६०० कोटींचा नफा

सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे केंद्रबिंदू असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेच्या आर्थिक व्यवहारात दोन हजार कोटींची घट झाली आहे.
MSE Bank
MSE BankAgrowon

Maharashtra State Cooperative Bank सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे केंद्रबिंदू असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बॅंकेच्या आर्थिक व्यवहारात दोन हजार कोटींची घट झाली आहे. मात्र बॅंकेला ६०० कोटी रुपयांचा घसघशीत निव्वळ नफा झाला आहे. देशात सर्वाधिक नक्त मूल्य असलेली सहकारी बॅंक (Cooperative Bank) म्हणून शिखर बॅंकेने (Shikhar Bank) आपला दबदबा कायम ठेवला आहे.

शिखर बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या म्हणण्यानुसार, बॅंकेचा ताळेबंद केवळ सभासदांसमोरच नव्हे तर जनतेसमोर ठेवणे हेदेखील महत्त्वाचे आहे.

त्यामुळे पारदर्शकता वाढून गुंतवणूकदारांमध्ये विश्‍वासाचे वातावरण तयार होते. त्यामुळेच आम्ही बॅंकेची सद्यःस्थिती स्वतःहून जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार बॅंकेचे नक्त मूल्य (नेटवर्थ) तपासले असता ते आता ३ हजार ८१७ कोटी रुपयांचे झाल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ५९० कोटींची वाढ झाली आहे. देशातील सर्वाधिक नक्त मूल्य असलेली सहकारी बॅंक म्हणून शिखर बॅंकेचा उल्लेख करावा लागेल.

MSE Bank
Cooperative Banks : जिल्हा बॅंकांचा रोकडविरहीत व्यवहार जलद होणार

‘‘कर्जवाटपात शिखर बॅंकेने ४९० कोटींनी वाढ करून एकूण कर्जवाटप २६ हजार कोटींच्या पुढे नेले आहे. राज्यातील साखर कारखाने व सूत गिरण्यांना ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे मानून शिखर बॅंकेने आपली धोरणे आखली आहेत.

यात आत्मनिर्भर कर्ज योजना, पुनर्बांधणी कर्ज योजना, एकरकमी कर्जफेड योजनेचा समावेश आहे. या योजनांमुळे साखर व सूत उद्योगातील व्यावसायिक वाटचालीत स्थिरता आणली जात आहे,’’ असा दावा अनास्कर यांनी केला.

MSE Bank
Rajarambapu Cooperative Bank : राजारामबापू बँकेला ४१ कोटींचा नफा

शिखर बॅंकेची गंगाजळी व भाग भांडवल आता ६ हजार ५६४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यातील वाढ ५३८ कोटी रुपयांची आहे. व्यावहारिक नियोजनाचा एक भाग म्हणून ठेवींमध्ये बॅंकेने २४५३ कोटींची घट केली आहे.

त्यामुळे मार्चअखेर बॅंकेच्या ठेवी १८६१४ कोटी रुपयांपर्यंत आल्या होत्या. त्यामुळे बॅंकेच्या एकूण व्यवहारातदेखील १९६३ कोटींची घट झाली आहे. त्यामुळे एकूण व्यवहार ४५ हजार ६४ कोटी रुपयांच्या आसपास झाल्याचे श्री. अनास्कर यांचे म्हणणे आहे.

राज्याच्या सहकारी बॅंकिंग व्यवस्थेला तंत्रज्ञानदृष्ट्या बळकट करण्यासाठी सायबर ऑपरेशन सेंटर उभारण्याचा निर्णय शिखर बॅंकेने घेतला होता. या सेंटरचे काम वेगाने सुरू असून, लवकरच ते कार्यान्वित होईल.
- विद्याधर अनास्कर, प्रशासक, शिखर बॅंक

...अशी आहे शिखर बॅंकेची आर्थिक वाटचाल

नक्त मूल्य-३८१७ कोटी रुपये

निव्वळ नफा-६०९ कोटी रुपये

बॅंकेचा स्वनिधी- ६५६४ कोटी रुपये

भांडवल पर्याप्तता निधी -१७.७६ टक्के

कर्जवाटपाचे प्रमाण - ८० टक्के

कर्जवाटप-२६४५० कोटी रुपये

बॅंकेचा एकूण आर्थिक व्यवहार-४५०६४ कोटी रुपये

प्रतिसेवक व्यवसाय- सरासरी ६४ कोटी रुपये

अनुत्पादक कर्जाचे निव्वळ प्रमाण-०.४५ टक्का

-बॅंक सभासदांना लाभांश वाटप ः १० टक्के

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com