Aadhar : ‘आधार’ अभावी रखडला ६२ शेतकऱ्यांचा लाभ

कर्जमुक्ती प्रोत्साहनपर दुसऱ्या यादीची प्रतीक्षा
62 farmers benefited due to lack of 'Aadhaar'
62 farmers benefited due to lack of 'Aadhaar'Agrowon

रत्नागिरी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती ((Mahatma Jotirao Phule Farmer Debt Relief Scheme)) प्रोत्साहनपर लाभ योजनेतील पहिल्या यादीत जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यातील १२ हजार ८८० शेतकऱ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला आहे; मात्र उर्वरित ६२ शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण केलेले नाही. त्यामुळे पहिल्या यादीतील लाभार्थ्यांना शंभर टक्के लाभ मिळालेला नाही. दुसरी यादी अद्याप जाहीर न झाल्यामुळे अर्ज दाखल केलेले १० हजार शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

62 farmers benefited due to lack of 'Aadhaar'
Mahatma Phule : महात्मा फुले यांचे कृषी विचार

शेती व शेतीशी निगडित कामांसाठी शेतकरी व व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षांत राज्यातील विविध भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर केली होती. राज्याच्या काही भागांत अवेळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे मागील काही वर्षांत शेती निगडित कर्जाची परतफेड होऊ शकली नव्हती. परिणामी, शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दुष्टचक्रात अडकला होता. त्यामुळे त्यांना नव्याने पीककर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या शेतकऱ्यांना २०१९ मध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू केली होती; पण अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड नियमित केली होती. त्यांना लाभ मिळाला नव्हता. नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपयांची प्रोत्साहन अनुदान देणारी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देणारी योजना लागू केली आहे.

62 farmers benefited due to lack of 'Aadhaar'
Farmer Incentive Scheme : पहिल्या यादीतील २८८ जणांचे आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून ही योजना अंमलात आणली असून, नियमित परतफेड केलेले कर्ज प्रोत्साहन अनुदान असलेल्या ५० हजारांपेक्षा कमी रकमेचे असल्यास त्यांनी उचल करून परतफेड केलेल्या रकमे एवढी रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्याचे जाहीर केले होते. प्रोत्साहन लाभ योजनेची पहिली यादी जाहीर होऊन महिना उलटला; मात्र, शासनाने अद्याप दुसरी यादी जाहीर केलेली नाही. प्रोत्साहन लाभ मिळावा, यासाठी जिल्ह्यातील २३ हजार ५९० शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केला आहे. यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा पहिल्या यादीत समावेश आहे. अद्याप १० हजार ७४८ शेतकर्‍यांची नावे आलेली नाहीत. दुसऱ्या यादीत त्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात याची पहिली यादी शासनाने जाहीर केली होती. त्यात जिल्ह्यातील १२ हजार ९४२ शेतकऱ्यांचा समावेश होता. पहिल्याच दिवशी ९ हजाराच्या वर शेतकर्‍यांच्या खात्यात ही प्रोत्साहन रक्कम झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com