
परभणी ः राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात ६३ कांदा चाळींची (Kanda Chal) कामे पूर्ण झाली आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांना ५१ लाख २५ हजार ३७० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळीसाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज केलेल्या शेतकऱ्यांपैकी सोडतीद्वारे ३ हजार ४८६ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात परभणी तालुक्यातील ४१७ अर्ज, जिंतूरमधील ३८४, सेलूमधील ३७३, मानवतमधील ५८१, पाथरीमधील ४०९, सोनपेठमधील ३८४, गंगाखेडमधील ३५९, पालममधील १८८, पूर्णा तालुक्यातील ३९१ अर्जाचा समावेश आहे. एकूण ४१ अर्ज नाकारण्यात आले. तर २ हजार ८६५ अर्ज रद्द करण्यात आले. त्यात परभणी तालुक्यातील ३३१ अर्ज, जिंतूरमधील ३०५, सेलूमधील ३२३, मानवतमधील ५१३, पाथरीमधील १३९, सोनपेठमधील ३२९, गंगाखेडमधील २६६, पालममधील १३९, पूर्णा तालुक्यातील ३२१ अर्जांचा समावेश आहे. उर्वरित ५८० अर्ज प्रक्रियेत आहेत. आजवर नऊ तालुक्यातील ६३ शेतकऱ्यांनी कांदा चाळी उभारण्याची कामे पूर्ण केली आहेत. त्या शेतकऱ्यांना ५१ लाख २५ हजार ३७० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
तालुकानिहाय कांदा चाळी
कामे स्थिती (अनुदान लाख रुपये)
तालुका प्रक्रियेतील अर्ज लाभार्थी शेतकरी अनुदान रक्कम
परभणी ८२ ४ ३.५०
जिंतूर ७३ ९ ७.८७
सेलू ४८ ५ ४.२०
मानवत ६७ ५ ४.१०
पाथरी ६५ १९ १४.१४
सोनपेठ ५२ ४ ३.४४
गंगाखेड ८१ ९ ७.१५
पालम ४३ ५ ४.२०
पूर्णा ६९ ३ २.६२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.