Water Storage : खानदेशातील प्रकल्पात ६५ टक्क्यांवर पाणीसाठा

अनेर प्रकल्पांतून शिरपूर भागात रब्बीसाठी पाणी
 Water Storage
Water StorageAgrowon

जळगाव : खानदेशातील प्रकल्पांतील (Khandesh Water Storage) जलसाठा ६५ टक्क्यांवर स्थिर आहे. धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर भागात अनुक्रमे अनेर व हतनूर प्रकल्पातून रब्बीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. जळगावमध्ये गिरणा धरणातूनही एक आवर्तन रब्बीसाठी सोडण्यात आले आहे. पण धरणगाव तालुक्यात वितरिका फुटल्याने हे आवर्तन थांबविण्यात आले होते.

 Water Storage
Water Storage: जायकवाडी पाणीसाठा 60 टक्क्यांवर

यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गिरणा धरणाचे पाणी पोहोचू शकले नाही. पण गिरणा धरणाच्या मदतीने जळगावमधील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव व एरंडोल भागात सिंचनास मदत झाली आहे.
धुळ्यातील अनेर प्रकल्पाचा लाभ जळगावमधील चोपडा व धुळ्यातील शिरपूर तालुक्यांनाही होतो. या प्रकल्पांतून मागील पंधरवड्यातच रब्बीसाठी पाणी सोडण्यात आले होते. सध्या खानदेशातील प्रमुख प्रकल्पांतील जलसाठा बऱ्यापैकी आहे.

गिरणा धरणातील साठा ७५ टक्क्यांवर आहे. हतनूर व अनेरमधील साठाही ६५ टक्क्यांवर आहे. तसेच जळगावमधील वाघूर (ता. जामनेर) प्रकल्पातील साठाही ७० टक्के एवढा आहे. वाघूरमधूनही रब्बीसाठी एकदा पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. यंदा जळगावमधील भोकरबारी प्रकल्प वगळता इतर कमाल प्रकल्प १०० टक्के भरले होते. धुळ्यातील पांझरा, सोनवद, बुराई हे प्रकल्पदेखील १०० टक्के भरले होते. नंदुरबारमधील दरा प्रकल्पदेखील १०० टक्के भरला होता. यामुळे सर्वत्र रब्बीसाठी पाणी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार रब्बीसाठी पाणी सोडले जात आहे.

 Water Storage
Water Storage: पुणे जिल्ह्यातील तीन धरणे भरली

रब्बीसाठी पाणी सोडल्याने अनेकांनी कापूस पीक काढून त्यात गहू, हरभऱ्याची पेरणी केली. काही शेतकऱ्यांनी आपल्याकडील कृत्रीम जलसाठा व आवर्तनाचे पाणी लक्षात घेऊन मका लागवड केली. यामुळे रब्बीची पेरणी अपेक्षेएवढी किंवा अनेक भागांत अधिक आहे. अनेकांनी रब्बी आवर्तनाच्या मदतीने हरभऱ्यासाठी पाट पद्धतीने एकदा सिंचन केले.
दादर ज्वारी जोमात

गिरणा धरणाच्या पाण्यामुळे गिरणा पट्ट्यात ज्वारी पीक वाढीस लागले आहे. यंदा या भागात संकरीत व पारंपरिक मानल्या जाणाऱ्या दादर ज्वारीचे पिकही चांगले आहे. या पिकास फक्त एकदा किंवा दोनदा सिंचन करावे लागते. मध्यम, काळ्या कसदार क्षेत्रात दादर ज्वारीचे पीक जोमात असून, ते काही दिवसात निसवेल. मुबलक चाराही यामुळे उपलब्ध होईल. या भागातील सुमारे पाच हजार हेक्टरवरील ज्वारी पिकास गिरणेच्या पाण्याचा लाभ झाल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com