Solapur News : सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी ६५८ कोटींचा आराखडा

जिल्ह्याच्या शाश्वत विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. २०२३-२४ साठी जिल्हा वार्षिक योजनेतून ६५८.२३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा प्रस्तावित केला आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

सोलापूर ः पर्यटन, शिक्षण, उद्योग, कृषी, प्रक्रिया उद्योगासह (Processing Industry) जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन (District Administration) कटिबद्ध आहे.

आगामी वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी वार्षिक योजनेतून ६५८.२३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार करण्यात (Rural Development Fund) आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी येथे दिली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलिस मुख्यालय कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली-उगले, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे या वेळी उपस्थित होते.

श्री. शंभरकर म्हणाले, की जिल्ह्याच्या शाश्वत विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. २०२३-२४ साठी जिल्हा वार्षिक योजनेतून ६५८.२३ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा प्रस्तावित केला आहे.

Rural Development
Grain Silos : सोलापूर येथे लवकरच सायलो धान्य कोठाराची उभारणी

या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. लोकप्रतिनिधी, माजी विद्यार्थी, तज्ज्ञ यांच्याशी समन्वय ठेवून जिल्ह्याचा सर्वंकष विकास आराखडा तयार केला जाणार आहे.

सुरत-चेन्नई महामार्गासाठी वेळेत भूसंपादन पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे, हा मार्ग सुरू झाल्यावर जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे येतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच कुंभारी येथील असंघटित कामगारांसाठीच्या ३० हजार घरांच्या प्रकल्पांतर्गत कामांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन पोलिस कॉन्स्टेबल मलकप्पा बणजगोळे यांनी केले.

३६ हजार हेक्टरवर पाणलोटची कामे

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, की जिल्ह्यात अमृत सरोवर अभियानातून १६४ पैकी १०८ कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियान १.० मध्ये जिल्ह्यातील ९३३ गावांमध्ये विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

जलयुक्त शिवार अभियान २.० च्या पहिल्या टप्प्यात २३२ गावे जलयुक्त करण्याचे नियोजन आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सुमारे २६ गावांमध्ये ३६ हजार हेक्टर क्षेत्र अंतर्गत ३२ कोटी रुपयांची पाणलोट विकासाची कामे प्रस्तावित आहेत, असे सांगून यावेळी त्यांनी चला जाणूया नदीला अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com