Maharajaswa Campaign : महाराजस्व अभियानाचा ६७० नागरिकांनी घेतला लाभ

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार आंबेगाव तालुक्यातील सर्व विभागांचा महाकॅम्प (महाशिबिर) मंचर येथे आयोजित करण्यात आला होता.
Dr. Rajesh Deshmukh
Dr. Rajesh DeshmukhAgrowon

मंचर, ता. आंबेगाव : येथील तालुकास्तरीय महाराजस्व अभियानाला (Maharajswa Campaign) नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ८११ लाभार्थींनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६७० लाभार्थींना प्रत्यक्षात लाभ मिळाला आहे.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या निर्देशानुसार आंबेगाव तालुक्यातील सर्व विभागांचा महाकॅम्प (महाशिबिर) मंचर येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शासकीय, निमशासकीय तालुका स्तरावरील सर्व विभाग उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी उपविभागीय अधिकारी सारंग कडोलकर, तहसीलदार रमा जोशी, पंचायत समिती गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, निवासी नायब तहसीलदार ए. बी. गवारी, नायब तहसीलदार लतादेवी वाजे, दामुराजे असवले, सचिन वाघ उपस्थित होते. एकात्मिक बालविकास, कृषी विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग व अन्य विभागातील अधिकाऱ्यांनी आपल्या कामकाजाविषयी आणि नवनवीन अमलात येणाऱ्या योजनांविषयी माहिती दिली. हे महाराजस्व अभियान ३० एप्रिलच्या आधी पुन्हा होणार आहे. या शिबिरात उर्वरित १४१ प्रलंबित लाभार्थींना लाभ देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

आंबेगाव तालुक्यात यापूर्वी तालुकास्तरीय पाच महाराजस्व अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. नागरिकांची बरीच कामे तत्काळ मार्गी लागली आहेत.

दर महिन्याला मंडलस्तरावर फेरफार अदालत घेतली जाते, त्यामुळे नागरिकांची वेळेची बचत होऊन प्रलंबित कामे मार्गी लागली आहेत. नागरिकांनी यापुढील काळात महाराजस्व अभियानात सहभाग नोंदवावा.

- रमा जोशी, तहसीलदार, आंबेगाव

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com