River Conservation : ‘अग्रणी’ पुनरुज्जीवनात बांधले ६८ बंधारे

कृष्णाची उपनदी असलेल्या १०५ किलोमीटर लांबीच्या अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन आम्ही केले. सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यात या नदीचे खोरे दुष्काळी आणि सारे पाणलोट अतिशोषित झालेले होते.
Water Conclave
Water Conclave Agrowon

Water Conclave कृष्णाची उपनदी (Krishna River) असलेल्या १०५ किलोमीटर लांबीच्या अग्रणी नदीचे पुनरुज्जीवन (River Revival) आम्ही केले. सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यात या नदीचे खोरे दुष्काळी आणि सारे पाणलोट अतिशोषित झालेले होते.

अशा स्थितीत जलबिरादरीच्या तीन जणांनी राजेंद्रसिंह (Rajendra Singh) यांची भेट घेतली व नदी पुनरुज्जीवनासाठी मार्गदर्शन घेतले.

त्यानंतर सुरू झालेल्या अग्रणी खोरे पुनरुज्जीवन प्रकल्पात महाराष्ट्रासह कर्नाटकातील नागरिकांनी भाग घेतला.

शेतकऱ्यांच्या श्रमदानातून या भागात ६८ बंधारे बांधले व त्यापैकी २१ बंधारे लोकांनी स्वखर्चातून बांधले. ३१८ हेक्टरवर सलग समांतर चर बांधले व १.२५ लाख वृक्ष लागवड केली.

Water Conclave
River Conservation : वर्धा जिल्ह्यातील पाच नद्यांची जलतज्ज्ञांद्वारे पाहणी

ही यशोगाथा सांगत होते महाराष्ट्रातील जलबिरादरी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र चुघ. जल परिषदेमधील चौथ्या चर्चासत्रात ते बोलत होते. वारी फाउंडेशनचे उज्जल चव्हाण निमंत्रक होते. यावेळी नमामी गंगेचे सरसंचालक जी अशोककुमार यांनी ऑनलाइन सहभाग घेतला.

Water Conclave
River Conservation : नदी अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप

कासलगंगा फाउंडेशनचे महेंद्र महाजन म्हणाले, ‘‘सोलापूर जिल्ह्यात चंद्रभागेच्या खोऱ्यातील कासलगंगा नदीचे पुनरुज्जीवन केले.

त्यासाठी लोकसहभाग व विविध संस्थांची मदत घेतली. आता आसपासच्या गावांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होत आहे.

’’ चुघ म्हणाले, ‘‘सांगलीच्या कवठेमहांकाळ, मिरज या तालुक्यात ५१ किलोमीटर नाल्यांना आम्ही नद्यांचे रुप दिले.

२५० हेक्टर पडीक जमीन लागवडीखाली आणली गेली.’’ अमित पतजोशी यांनी अर्थविषयक योजनांची माहिती दिली. देवांग शू दत्त यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

उज्ज्वल चव्हाण म्हणाले...

जळगावच्या धामणगावमध्ये जल संवर्धनाचे काम केले.

सात जिल्ह्यांत ७० गावांमध्ये ४५० कोटी लिटर्स पाण्याची साठवण करण्यास मदत

प्रत्येकी पाच गावांना जबाबदारी दिली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com