
सातारा : जिल्ह्यातील ३१९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Gram Panchayats Election) होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या (ता. २ ) दिवसापर्यंत सरपंचपदाच्या (Sarpanch Election) ३१९ जागांसाठी १,४४१, तर सदस्य पदाच्या २,६६१ जागांसाठी तब्बल ६,९५७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असूनही मागील काही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड झाली आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे.
त्यामुळे आता भाजपने सर्व निवडणुकांत लक्ष घालण्याची तयारी केली आहे. गावपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असली, तरी नेत्यांसोबत कार्यकर्तेही भाजपचे झाल्याने यावेळेस सर्वच निवडणुकांत राष्ट्रवादीविरुद्ध भाजप असा सत्ता संघर्ष पाहायला मिळणार आहे.
जिल्ह्यातील पाटण, कोरेगाव, महाबळेश्वरमध्ये बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
तर, सातारा, जावळी, वाई, कऱ्हाड, खंडाळा, फलटण, माण, खटावमध्ये राष्ट्रवादी व भाजपमध्ये लढत होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेससोबतच भाजप, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील नेते या संघर्षात एकमेकांना भिडणार आहेत.
भाजपशी दोन हात करताना राष्ट्रवादीला प्रत्येक तालुक्यात महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे, तर भाजपसोबत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, रयत क्रांती संघटना, रासप आदी सहभागी होणार आहेत. जास्तीतजास्त ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपमध्येच संघर्ष होणार आहे. परिणामी, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकांचा पाया भक्कम करण्याची तयारी या दोन पक्षांकडून होणार आहे.
तालुकानिहाय दाखल अर्ज :
सातारा : सरपंच १४०, सदस्य ८५०, कऱ्हाड ः सरपंच १८९, सदस्य १०१९, पाटण : सरपंच ३६०, सदस्य १६७८, कोरेगाव : सरपंच २०७, सदस्य १०१२, वाई : सरपंच ३५, सदस्य १९७, खंडाळा : सरपंच २०, सदस्य १३४, महाबळेश्वर : सरपंच १३, सदस्य ६०, जावळी : सरपंच ४६, सदस्य १९०, फलटण : सरपंच १६९, सदस्य ७३६, माण : सरपंच १८३ सदस्य ७७६, खटाव : सरपंच ७९, सदस्य ३०५.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.