Sugarcane Labor : ऊसतोड कामगार पुरविण्याच्या बहाण्याने सात लाखांची फसवणूक

तळेगाव ढमढेरे येथील संतोष भुजबळ यांचा ऊसतोडणी कामगार घेऊन ऊस कारखान्याला पुरवण्याचा व्यवसाय आहे. ते ऊसतोडणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून ऊसतोड कामगार आणत असतात.
Sugarcane Labor
Sugarcane LaborAgrowon

Sugarcane Season तळेगाव ढमढेरे, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील ऊसतोड (Sugarcane Harvesting) ठेकेदारास ऊसतोडणीसाठी कामगार (Sugarcane Labor) पुरवितो, असे म्हणून तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्याला शिक्रापूर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद केले आहे. स्वप्नील गोविंद गायकवाड असे आरोपीचे नाव आहे.

तळेगाव ढमढेरे येथील संतोष भुजबळ यांचा ऊसतोडणी कामगार घेऊन ऊस कारखान्याला पुरवण्याचा व्यवसाय आहे.

ते ऊसतोडणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून ऊसतोड कामगार आणत असतात. त्यांच्या व्यवसायातून त्यांची स्वप्नील गायकवाड या व्यक्तीसोबत ओळख झाली.

Sugarcane Labor
Sugarcane Labors : कारखाने सुरू, मात्र ऊसतोडणीला अडथळा

त्यांनतर गायकवाड यांनी ऊसतोड कामगारांना ॲडव्हान्समध्ये पैसे देण्यासाठी काही पैशांची वेळोवेळी मागणी केली असता संतोष भुजबळ यांनी स्वप्नील गायकवाड यांना तब्बल सात लाख रुपये दिले.

मात्र त्यानंतर देखील कामगार येत नसल्याने गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे भुजबळ यांच्या निदर्शनास आले.

Sugarcane Labor
Sugarcane Labor : ‘ऊसतोडणी कामगारांना सुविधा द्या’

याबाबत संतोष विठोबा भुजबळ यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी कन्नड तालुक्यातील (छत्रपती संभाजीनगर) हरसवाडी येथील स्वप्नील गोविंद गायकवाड या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.

त्यानंतर पोलिस नाईक महेंद्र पाटील व उद्धव भालेराव यांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन गायकवाड यास अटक केली आहे. संबंधित गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेंद्र पाटील हे करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com