SEZ in Khed-Shirur : खेड-शिरूरमधील ७ गावांमधील ६ हजार एकर क्षेत्र अखेर ‘एसईझेड’मुक्त

खेड व शिरूरमधील सात गावांमधील तब्बल ६ हजार ४४७ एकर क्षेत्र खेड एसईझेडमधून (विशेष आर्थिक क्षेत्र) वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उद्योगमंत्री उदय सावंत यांनी बुधवारी (ता.२९) झालेल्या बैठकीत घेतला.
Land Acquisition for SEZ Projects
Land Acquisition for SEZ Projects Agrowon

Pune News : खेड व शिरूरमधील सात गावांमधील तब्बल ६ हजार ४४७ एकर क्षेत्र खेड एसईझेडमधून (Special Economic Zone) (विशेष आर्थिक क्षेत्र) वगळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय उद्योगमंत्री उदय सावंत यांनी बुधवारी (ता.२९) झालेल्या बैठकीत घेतला.

या निर्णयामुळे खेड विशेष आर्थिक क्षेत्राच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संपादनासाठी (Land Acquisition) राखीव ठेवलेले क्षेत्र आता पूर्णत: शेतकऱ्यांच्या मालकीचे झाले आहे. या क्षेत्राशी आता शासनाचा कुठलाही संबंध नसल्याची माहिती माजी खासदार आणि शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांनी दिली.

खेड सेझ प्रकल्पाकरिता खेड व शिरूर तालुक्यातील हजारो एकर जमिनीवर २००६ मध्ये संपादनाचे शिक्के टाकण्यात आले होते. मात्र तत्कालीन शासनाने जाहीर केलेला मोबदला अतिशय तुटपुंजा असल्याने जमिनीच्या भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा अथवा जमिनीवरील सेझचे शिक्के काढण्यासाठी मागणी शेतकऱ्यांची होती.

Land Acquisition for SEZ Projects
Land Acquisition : सेझ प्रकल्पग्रस्तांचा सात-बारा कोरा करा

यासाठी विविध सरकारमधील मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. दरम्यान, १३ सप्टेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्यासह बाधित गावातील शेतकऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली.

सन २००६ पासूनचा शेतकऱ्यांचा संघर्ष या बैठकीत श्री. आढळराव यांनी मांडला आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने सेझचे शिक्के काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.

Land Acquisition for SEZ Projects
Land Acquisition : शेतकऱ्यांच्या सात-बारावरून‘एमआयडीसी’ची नोंद हटवली

या बैठकीनंतर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने एमआयडीसी भूसंपादनाचे महाव्यवस्थापक यांनी ९ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्याचे उद्योग विभागाचे अवर सचिव यांना सदर क्षेत्र विनाअधिसूचित करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला.

त्यास महाराष्ट्र शासनाचे सह सचिव यांनी मंजुरी देत १६ जुलै २००६ व १७ एप्रिल २०१० रोजी खेड सेझसाठी अधिसूचित केलेले ६ हजार ४४७ एकर क्षेत्र विनाअधिसूचित करण्यास शासन मान्यता दिल्याचे आदेश काढण्यात आल्याचे आढळराव यांनी सांगितले.

गावनिहाय एसईझेडमुक्त क्षेत्र..! (हेक्टरमध्ये)

गोसाशी (ता. खेड) २२८.९५

वाफगाव (ता. खेड) ३८९.६८

चौधरवाडी (ता. खेड) १७३.१८

पाबळ (ता. शिरूर) ५५९.३१

रेटवडी (ता. खेड) ५७९.०१

वरुडे (ता. खेड) ६०७.०३

पूर (ता. खेड) ४२.७३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com