Sahyadri Farms : ‘सह्याद्री फार्म्स’कर्मचाऱ्यांना देणार ७० कोटींचे शेअर्स

मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीतर्फे कर्मचाऱ्यांसाठी एम्पलॉयी स्टॉक ओनरशिप प्लॅन (ईसॉप) योजना लागू करण्यात आली आहे.
Sahyadri Farms
Sahyadri FarmsAgrowon

Nashik News : मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीतर्फे (Sahyadri Farms) कर्मचाऱ्यांसाठी एम्पलॉयी स्टॉक ओनरशिप प्लॅन (ईसॉप) योजना लागू करण्यात आली आहे.

त्यानुसार कर्मचाऱ्यांना ७० कोटी रुपयांचे समभाग (शेअर्स) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ७० कोटी रुपयांच्या कंपनीच्या एकूण देयकाच्या चार टक्के समभाग या योजनेला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे.

अल्पभूधारक व छोट्या शेतकऱ्यांच्या मालकीची एकात्मिक मूल्यसाखळी म्हणून ‘सह्याद्री फार्म्स‘ला ओळखले जाते.

सह्याद्री फार्म्स ही ग्रामीण भारतात इसॉप योजनेची घोषणा करणारी पहिली संस्था आहे. या योजनेत ‘सह्याद्री फार्म्स‘च्या वाढीसाठी मूल्यनिर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सर्व भागधारकांसाठी सर्वसमावेशक वाढ आणि मूल्यनिर्मिती हे ‘सह्याद्री फार्म्स‘ची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. सर्व भागधारकांसाठी, प्रामुख्याने शेतकरी भागधारकांसह ग्राहक आणि कर्मचारी यांच्यासाठी मूल्य निर्माण करत आहे.

Sahyadri Farms
Sahyadri Farms : नशीब स्वत:चे घडवित नेई ‘कर्ता शेतकरी’

इसॉप योजनेत समाविष्ट कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ४६१ आहे. तर तिचा विहित कालावधी चार वर्षांचा आहे. यात कंपनीतील सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश हे. कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करता ही एक अनोखी योजना आहे, ज्यामध्ये पदानुक्रमाचे निकष न ठेवता सर्वांना लाभ मिळेल.

Sahyadri Farms
Hailstorm Crop Damage : माण, खटावला गारपिटीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

या योजनेसाठी इतर अनेक कंपन्या प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांवरच लक्ष केंद्रित करत असताना सह्याद्री फार्म्सने मात्र सर्व कर्मचाऱ्यांचा या योजनेत समावेश केला आहे. यामुळे कंपनी आणि कर्मचाऱ्यांतील बंध अधिक मजबूत होतील. कामाची उत्पादकता वाढण्याबरोबरच थेट आर्थिक पाठबळ मिळण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे.

गेली अनेक वर्षे सह्याद्री फार्म्समध्ये काम करीत आहे. अगदी सुरुवातीपासून या संस्थेच्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. संस्था आता प्रगतीच्या टप्प्यावर असताना व्यवस्थापनाने आमच्याही संपत्ती निर्माणाचा विचार करून आम्हाला समभाग देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. अधिक जबाबदारीने, आपलेपणाने कष्ट करण्यास आम्हाला अधिक बळ येणार आहे.

- जनार्दन उन्हवणे, कर्मचारी, सह्याद्री फार्म्स

अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा आणि श्रमाचा योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या सह्याद्री फार्म्सने कर्मचाऱ्यांच्या हितालाही तितकेच प्राधान्य दिले आहे. ही योजना त्याचाच एक भाग आहे. कंपनीच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली.

- विलास शिंदे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक-सह्याद्री फार्म्स

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com