जायकवाडीत ७२.९७ टक्के जिवंत पाणीसाठा

जायकवाडी प्रकल्पातील पाणीपातळी लक्षात घेऊन कोणत्याही क्षणी गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग करावा लागणार आहे.
Jaykwadi Dam
Jaykwadi DamAgrowon

औरंगाबाद : जायकवाडी प्रकल्पामध्ये (Jaykawadi Dam) ७२.९७ जिवंत पाणीसाठा १८ जुलै रोजी झाला आहे. पाणलोट क्षेत्रात (Dam Catchment Area) चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांद्वारे जायकवाडी धरणात पाण्याची आवक (Water Arrival In Jaykwadi Dam) वाढत असल्याने धरणाची पाणीपातळी वाढत आहे, असे या संदर्भात जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभा जाधव यांनी पत्र प्रसिद्धीसाठी दिले आहे.

Jaykwadi Dam
Water Storage: जायकवाडी पाणीसाठा 60 टक्क्यांवर

जायकवाडी प्रकल्पातील पाणीपातळी लक्षात घेऊन कोणत्याही क्षणी गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग करावा लागणार आहे. त्यामुळे आवश्यक ती सूचना व उपाययोजना करण्याचे जायकवाडी पाटबंधारे विभागाने औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापनाला सूचित केले आहे.

कुठलीही जीवित वा वित्तहानी होऊ नये, याबाबत उक्त गावांना सावधानतेचा इशारा देणे तसेच संबंधित यंत्रणांना खबरदारी घेणेबाबत आपल्या स्तराहून आदेश देण्यात यावेत, असे सूचित केले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास जायकवाडी प्रकल्पात २३ हजार २७६ क्युसेकने पाण्याचे आवक सुरू होती. तर प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा १६५८.५११ दलघमी म्हणजे ७६.४० टक्क्यांवर पोहोचला होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com