
Pune News : गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती (Natural Calamity) व अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक आणि इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ७३ कोटी ६० लाख ३८ हजार रुपये नुकसान भरपाई (Crop Damage Compensation) मंजूर झाली असून, ही भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
यामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या ८५ हजार ४४५ शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांनी दिली.
दरम्यान, जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतीपिकाच्या नुकसानीसाठी ३ कोटी १४ लाख २१ हजार रुपये आणि शेतजमीन खरडून झालेल्या नुकसानीपोटी १३ लाख ६४ हजार रुपये भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आल्याचे देखील खराडे यांनी सांगितले.
आपत्ती व अतिवृष्टीमुळे बाधित गावे, शेतकरी, बाधित क्षेत्र व नुकसान भरपाई पुढीलप्रमाणे.
तालुका --- बाधित गावे --- शेतकरी ---- बाधित क्षेत्र (हेक्टर) --- नुकसान भरपाई (रुपयांमध्ये)
भोर --- ७८ --- ५२३ --- १६५.६६ --- २३ लाख १० हजार.
वेल्हा --- २ --- शेतकरी --- ११ - १.२१ --- ३९ हजार
मावळ --- ७ ---११४,--- २४ --- ३ लाख २६ हजार.
हवेली ---१०४ ---७ हजार ४९० --- ३ हजार १४६.१९---- ८ कोटी ३३ लाख २ हजार.
खेड --- ३४ ---१ हजार ९४७ --- १ हजार ८१.४१ ---२ कोटी २ लाख २३ हजार रुपये.
आंबेगाव--- ८९ ९ हजार ७७९ --- २ हजार ६४६. ८५ ---- ४ कोटी ९६ लाख ६९ हजार.
जुन्नर --- १७६ ----२२ हजार ५९१ --- १४ हजार ५५६.३५ --- २४ कोटी ५१ लाख ४६ हजार.
शिरूर --- ६७ ---- ४ हजार ७३४ --- १ हजार ९६९.५४ --- ४ कोटी ५६ लाख ६६ हजार.
पुरंदर --- १४६, २७ हजार ८४१ ---- ९ हजार ३३२.४० --- २१ कोटी २६ लाख ५७ हजार रुपये.
दौंड ---- ३० ---- २ हजार ८ ---- ८१८.५७ ---२ कोटी १४ लाख ८० हजार
बारामती -- १०१ ---- ८ हजार ४१७ ---- ३ हजार ४८०.२८ ---- ५ कोटी ५२ लाख २० हजार रुपये
भरपाईसाठी ७० लाख रुपये अनुदानाची मागणी
जिल्ह्यात मार्च २०२३ मधील अतिवृष्टीमुळे एकूण ८४ गावांतील १ हजार ४३४ शेतकऱ्यांची ४०८.९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, शेतीपिके व फळपिकांच्या नुकसानीपोटी ७० लाख ७० हजार रुपये अनुदान मागणी केली असल्याचे खराडे यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.