आसाममध्ये पुराच्या बळींच्या संख्या ७३

गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आसाममध्ये हाहाकार उडाला असून सोमवारीही पूरस्थिती गंभीरच होती.
आसाममध्ये पुराच्या बळींच्या संख्या ७३
Assam FloodAgrowon

गुवाहाटी (वृत्तसंसथा) ः गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने (Heavy Rain Assam) आसाममध्ये हाहाकार उडाला असून सोमवारीही पूरस्थिती गंभीरच (Flood Condition In Assam) होती. राज्यातील ३५ पैकी ३३ जिल्ह्यांतील जवळपास ४३ लाख नागरिकांना पुराचा फटका (Flood Affected) बसला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी मंत्र्यांसह संबंधित जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आढावा बैठक घेतली. त्यानंतर, त्यांनी पुराची तीव्रता अधिक असणाऱ्या भागात हवाईमार्गे अन्न व इतर जीवनावश्यक साहित्य टाकण्याचे आदेश दिले. राज्यात पूर व दरडीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता ७३ वर गेली आहे.

मुख्यमंत्री सरमा यांनी मंत्री, सरकारी अधिकारी व उपायुक्तांबरोबर आभासी बैठक घेतली. त्यात त्यांनी मदत व बचावकार्याला सर्वाधिक प्राधान्य देण्याच्या तसेच नियमांचा हवाला देऊन उशीर न करण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, की राज्यातील पुराची तीव्रता अधिक असणाऱ्या व एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कराच्या नौका पोचू न शकणाऱ्या भागात हवाई मार्गे मदत व बचाव कार्य राबवावे. त्याचप्रमाणे, अधिकाऱ्यांनी नियमांची काळजी न करता पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित करावे. राज्यातील एखाद्या पूरग्रस्त भागाचा नियमावलीत समावेश नसल्यास तिथे प्राधान्य विकास योजना आणि मुख्यमंत्री मदत निधीतून मदतकार्य राबवावे. पूरग्रस्त भागातील गंभीर रुग्णांना नजीकच्या रुग्णालयात हलविण्यासाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी मदत छावण्यांत नियमितपणे डॉक्टरांना पाठवावे. पुराचे पाणी ओसरु लागताच तातडीचे पंचनाम्यास सुरुवात करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पुरामुळे आसाममधील ३३ जिल्ह्यांतील ५ हजार १३७ गावांना फटका बसला आहे. जवळपास दोन लाख नागरिकांनी ७४४ मदत छावण्यात आश्रय घेतला आहे.

दोन पोलिसांना जलसमाधी

आसाममधील नागाव जिल्ह्यात पुरात अडकलेल्या लोकांची मदत करणारे दोन पोलिस रविवारी वाहून गेले होते. सोमवारी त्यांचे मृतदेह सापडले. कामरूप पोलिस ठाण्याचे प्रभारी सम्मुजल काकोटी यांच्या नेतृत्वाखाली चार पोलिसांचे पथक पाचोनिजार माधूपूर या गावात पुरात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी नौकेतून गेले होते. मात्र, पोलिस बोटीतून अचानक पाण्यात पडून वाहून गेले. दोन पोलिसांना एसडीआरएफने वाचविले.मात्र, काकोटी व कॉन्स्टेबल राजीव बार्डोलेई या दोघांचा मृत्यू झाला.

काझिरंगात आठ प्राण्यांचा मृत्यू

आसाममधील प्रसिद्ध काझिरंगा राष्ट्रीय उद्यानालाही पुराचा मोठा फटका बसला आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने किंवा वाहनाच्या धडकेने उद्यानातील सात हरिण व एक बिबट्या अशा आठ प्राण्यांचा समावेश आहे. इतर आठ हरणे व एका अजगरासह दहा प्राण्यांची वनखात्याने सुखरुप सुटका केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com