Opium Seize : खटाव तालुक्यात ७५ किलो अफू जप्त

वाकळवाडी (ता. खटाव) येथील शेतात लावलेला ७५ किलो वजनाचा अफू वडूज पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. त्याची किंमत एक लाख ५२ हजार ७०० रुपये होते.
Opium
OpiumAgrowon

Opium Farming वडूज, जि. सातारा : वाकळवाडी (ता. खटाव) येथील शेतात लावलेला ७५ किलो वजनाचा अफू (Opium Seize) वडूज पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. त्याची किंमत एक लाख ५२ हजार ७०० रुपये होते.

याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, शांताराम रामचंद्र मोप्रेकर, चंद्रप्रभा शिवाजी मोप्रेकर, विमल पंढरीनाथ मोप्रेकर (सर्व राहणार वाकळवाडी) अशी त्यांची नावे आहेत.

Opium
शेतकऱ्याने मागितली गांजा लागवडीसाठी परवानगी !

याबाबत वडूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकळवाडी येथील शिवारात सुमारे एक गुंठे क्षेत्रात अफूची लागवड केली असल्याची माहिती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी कर्मचाऱ्यांसह संबंधित ठिकाणावर छापा टाकला.

Opium
opium Farming: अफू, गांजाच्या शेतीस परवानगी मिळावी

या छाप्या दरम्यान वाकळवाडी शिवारात शांताराम मोप्रेकर, चंद्रप्रभा मोप्रेकर, विमल मोप्रेकर यांनी स्वतःच्या शेतात गहू, हरभरा, कांदा पिकाच्या आडोशाला अफूची लागवड केल्याचे दिसून आले. तर लागवडीनंतरची ७५ किलो वजनाची ७ पोती पोलिसांना आढळून आली.

औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम कलमानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत मालोजीराव देशमुख, पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर, दादा देवकुळे, संदीप शेडगे, दऱ्याबा नरळे, दीपक देवकर, भूषण माने, शिवाजी खाडे, सागर बदडे, मेघा जगताप, वृषाली काटकर यांनी सहभाग घेतला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com