Rabi Sowing : नगर जिल्ह्यात रब्बीची ७५ टक्के पेरणी

नगर जिल्ह्याचे रब्बीचे सरासरी ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या काही वर्षांपासून ज्वारीचे क्षेत्र कमी होत आहे. यंदाही या क्षेत्रात घट झाली आहे.
Rabbi Season
Rabbi SeasonAgrowon

नगर ः नगर जिल्ह्यात आतापर्यंत रब्बीची सरासरीच्या ७५ टक्के म्हणजे ३ लाख ४३ हजार ३८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी (Rabi Sowing) झाली आहे. सर्वात कमी ज्वारीची ५२ टक्के पेरणी (Jowar Sowing) झाली असून गहू, मका (Maize Sowing), हरभऱ्याने (Chana Sowing) सरासरी क्षेत्र ओलांडले आहे.

नगर जिल्ह्याचे रब्बीचे सरासरी ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या काही वर्षांपासून ज्वारीचे क्षेत्र कमी होत आहे. यंदाही या क्षेत्रात घट झाली आहे.

आतापर्यंत एकूण ३ लाख ४३ हजार ३८ हेक्टवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे ८८,३७६ व गव्हाचे सरासरी ८६ हजार ४०४ हेक्टर क्षेत्र असून यंदा गव्हाची व हरभऱ्याची पेरणी सरासरीच्या पुढे गेली आहे.

मक्याचे १४ हजार ११८ हेक्टर सरासरी क्षेत्र असून आतापर्यंत मक्याची १३५ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात यंदा तेलबियांच्या क्षेत्रातही फारशी वाढ झाली नाही.

एकूण तेलबियांचे ४८६ हेक्टर सरासरी क्षेत्र असून त्यातील १३२ म्हणजे २७ टक्के पेरणी झाली आहे. यंदा जिल्ह्यात उसाच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे.

ऊसाचे रब्बीच्या लागवडीचे सरासरी ९६ हजार ६९३ हेक्टर क्षेत्र आहे. आतापर्यंत सुमारे ७१ हजार ७१७ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे.

रब्बीची आतापर्यंत नगर तालुक्यात ८६ टक्के, पारनेरला ७७ टक्के, श्रीगोंदे, कर्जतला प्रत्येकी साठ टक्के, जामखेडला ९५ टक्के, शेवगावला २७ टक्के, पाथर्डीला ११७ टक्के, नेवाशाला ३७ टक्के, राहुरीला ६९ टक्के, संगमनेर तालुक्यात ४९ टक्के, अकोले तालुक्यात १५१ टक्के, कोपरगाव तालुक्यात १०६ टक्के, श्रीरामपूर तालुक्यात १०१ टक्के व राहाता तालुक्यात १०० टक्के पेरणी झाली आहे.

Rabbi Season
Rabi Sowing : पाच जिल्ह्यांत १६ लाख ७९ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी

पीकनिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

ज्वारी - १,३९,९४६

गहू - ९४,१९४

मका - १९,१७८

हरभरा - ८९,३२९

तेलबिया - १३२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com