Onion Subsidy : पाऊण लाख शेतकऱ्यांचे कांदा अनुदानासाठी अर्ज

कांद्याला दर नसल्याने अनुदान देण्यात येणार असल्याने अनुदान मिळावे यासाठी नगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७५ हजार ३२५ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
Onion Market
Onion MarketAgrowon

Nagar News : कांद्याला दर नसल्याने अनुदान (Onion Subsidy) देण्यात येणार असल्याने अनुदान मिळावे यासाठी नगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७५ हजार ३२५ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठीची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये कांद्याला दर नसल्याने शासन प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देणार आहे. एका शेतकऱ्याला २०० क्विंटलच्या मर्यादित म्हणजे जास्तीत जास्त ७० हजार रुपये अनुदान दिले जाईल. अनुदानासाठी अर्ज करण्यासाठी बाजार समिती, खासगी बाजार समिती, नाफेड खरेदी केंद्र आदी ठिकाणची कांदा विक्री ग्राह्य धरण्यात येत आहे.

Onion Market
Onion Subsidy : कांदा अनुदान म्हणजे धूळफेक

‘‘आतापर्यंत नगर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ७५ हजार ३२५ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. नगर बाजार समितीतून सर्वाधिक सुमारे ३२ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. पारनेर, राहुरीतूनही बऱ्यापैकी अर्ज आले आहेत’’, असे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी सांगितले.

Onion Market
Onion Subsidy : कांदा अनुदानाच्या अर्जांसाठी शेतकऱ्यांची वाढली गर्दी

नगर जिल्ह्यातील तालुकानिहाय अर्ज

नगर : ३१,२९०

राहुरी: ६,३३२

राहता : १,३४३

संगमनेर : ७,३०४

अकोले : ४०३

कोपरगाव : ५,५५७

श्रीरामपूर : १,३९७

नेवासा : ५,८४८

शेवगाव : १,८३१

पाथर्डी : ३००

जामखेड : ४,६९०

कर्जत : १,४०४

श्रीगोंदा : १,२५८

पारनेर : ६,३६५

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com