Crop Damage Compensation : विदर्भातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ७५० कोटींची मदत

विदर्भातील सतत पडणाऱ्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने पहिल्यांदाच ७५० कोटी रुपयांची मदत दिल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
Crop Damage Compensation
Crop Damage Compensation Agrowon

नागपूर : विदर्भातील सतत पडणाऱ्या पावसामुळे बाधित (Crop Damage) शेतकऱ्यांना राज्य शासनाने पहिल्यांदाच ७५० कोटी रुपयांची मदत (Crop Damage Compensation) दिल्याची माहिती मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधान परिषदेत दिली. विदर्भातील अतिवृष्टीबाधित संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सदस्य अमोल मिटकरी यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सामंत बोलत होते.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : गारपिटीच्या भरपाईपासून केळी उत्पादक वंचित

मंत्री सामंत म्हणाले, की अमरावती विभागात संत्री फळपिकाचे कोळशी या रोगामुळे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले नाही. तथापि, नागपूर जिल्ह्यात संत्री पिकावर २ हजार ८८२ हेक्टर आणि मोसंबी पिकावर २७० हेक्टर क्षेत्र अशा एकूण ३ हजार १५२ हेक्टर क्षेत्रावर कोळशी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

Crop Damage Compensation
Crop Damage : सततच्या पावसातील नुकसानीची महिन्यात मदत

हा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या खाली आहे. हॅार्टसॅप योजनेंतर्गत कीड सर्वेक्षण व कीड नियंत्रक यांच्यामार्फत सर्वेक्षण व जनजागृती केली. या सर्वेक्षणामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील किंवा सर्वेक्षणापासून वंचित राहिलेल्या ठिकाणी पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील. विदर्भातील शेती आणि फळपिकांच्या बाधितक्षेत्रासाठी ३ हजार १०३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई राज्य शासनाकडून वितरित करण्यात आली असल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी उत्तरात दिली.

पीक विम्याबाबत उपप्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, की अमरावतीमध्ये एकूण शेतकऱ्यांची संख्या ९ हजार २७६ असून क्षेत्र ९ हजार २५७ हेक्टर आहे. देय रक्कम ही १८६१. ३४ लाख रुपये आहे. त्यापैकी ४ हजार ६९७ शेतकऱ्यांना १८५१.३१ कोटी रुपये पीक विम्याचा लाभ मिळाला असल्याची माहिती सामंत यांनी दिली. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर, अनिकेत तटकरे, डॉ. रणजित पाटील, प्रवीण लटके यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.

‘जनजागृती मोहिमेला गती’

‘‘विदर्भातील अमरावती व नागपूर विभागातील संत्रा व मोसंबी उत्पादकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहिमेला गती देण्यात येईल. फळपिकांवरील औषध फवारणीबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचार-प्रसार करण्याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या जातील,’’ असे मंत्री उदय सामंत यांनी उत्तरात सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com