Lumpy Skin : सोलापुरात ७६२ जनावरांचा मृत्यू

जिल्ह्यात जनावरातील ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वरचेवर वाढताना दिसतो आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७८२ गावांतील ७६२ जनावरांचा लम्पी स्कीनमुळे मृत्यू झाला आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर  ः जिल्ह्यात जनावरातील ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) चा प्रादुर्भाव वरचेवर वाढताना दिसतो आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ७८२ गावांतील ७६२ जनावरांचा लम्पी स्कीनमुळे मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागाकडून लम्पी स्कीनला प्रतिबंधासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु अद्यापही हा आजार नियंत्रणात येऊ शकलेला नाही. प्रामुख्याने माळशिरस, करमाळा, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांना त्याची सर्वाधिक झळ बसली आहे.

Lumpy Skin
Lumpy Skin : लम्पीवर लसीकरण प्रभावी ठरतंय का ?| ॲग्रोवन

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून लम्पी स्कीनची बाधा जिल्ह्यात आहे. आतापर्यंत जवळपास १२ हजार ४९० जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाली होती. त्यापैकी ४ हजार ८४९ जनावरे लम्पी स्कीनमुक्त झाली आहे. सद्यःस्थितीत सहा हजार ८७९ जनावरांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३३१ जनावरे अत्यवस्थ स्थितीत आहेत. तर, केवळ लम्पी स्कीनमुळे ७६२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावललेल्या जनावरांमध्ये सर्वाधिक माळशिरस तालुक्यातील २५८ जनावरांचा समावेश आहे. त्यानंतर करमाळ्यातील २०८, अक्कलकोटमधील नऊ, बार्शीतील तीन, माढ्यातील ८५, मंगळवेढ्यातील १४, मोहोळमधील १०, उत्तर सोलापुरातील १८, पंढरपुरातील ५९, सांगोल्यातील ८ आणि दक्षिण सोलापुरातील नऊ जनावरांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना मदतीचे वाटप

लम्पी स्कीनमुळे ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. त्यांना शासनाकडून मदत दिली जाते आहे. आतापर्यंत ८४ मृत जनावरापोटी शेतकऱ्यांना २० लाख ३५ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित जनावरांपोटी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव तयार आहे. लवकरच त्यांनाही मदत देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.


दूधपट्ट्यात चिंता
प्रामुख्याने माळशिरस, करमाळा, पंढरपूर, सांगोला, करमाळा या भागांत मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जाते. त्यातही गाईचा दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे आणि याच दूधपट्ट्यात सध्या लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यात माळशिरस आणि करमाळ्याला सर्वाधिक झळ बसली आहे. जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण याच भागात अधिक आहे. त्यामुळे या दूधपट्ट्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com