पशुसंवर्धनसाठी सिंधुदुर्गमध्ये ८० लाखांची तरतूद

२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने विविध योजना राबविण्यासाठी ८० लाख ४८ हजारांची तरतूद केली आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या (Department Of Animal Husbandry) विविध योजनांसाठी ८० लाख ४८ हजारांच्या निधीची (Fund For Animal Husbandry) तरतूद करण्यात आली आहे. या निधीचा ४ हजार ४ हजार ४९९ शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे. (Animal Care)

२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाने विविध योजना राबविण्यासाठी ८० लाख ४८ हजारांची तरतूद केली आहे. या निधीतून शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर शेळीगट पुरविणे, महिला सबलीकरणासाठी ७५ टक्के अनुदानावर शेळी गट पुरविणे, ७५ टक्के अनुदानावर विजेवर चालणाऱ्या कडबाकुट्टी यंत्रांचा पुरवठा करणे, ४० टक्के अनुदानावर दोन दुधाळ जनावरांचा पुरवठा करणे, महिला सबलीकरणाकरिता ७५ टक्के अनुदानावर सुधारित जातीच्या एकदिवशी ५० कुक्कुट पिल्लांचा गट व खाद्य पुरवठा करणे याचा समावेश आहे.

Animal Care
Animal Care : ओळखा जनावरांतील संसर्गजन्य आजाराची लक्षणे

तसेच ९० टक्के अनुदानावर फॅट मशीनचा पुरवठा करणे, पशुधन उत्पादनासाठी ५० टक्के अनुदानावर संकरित, देशी सुधारित कालवडीसाठी पशुखाद्य पुरवठा करणे, वैरण विकास योजनेतर्गत १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे तयार करणे, विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध लाभार्थींकडील दुभत्या, गाभण, भाकड जनावरांना १०० टक्के अनुदानावर पशुखाद्य पुरवठा करणे आदी योजना राबविल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील ४ हजार ४९९ शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी २६ ऑगस्टपर्यंत आधारकार्ड रेशनकार्ड, रहिवासी दाखला, याशिवाय विविध कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विद्यानंद देसाई यांनी केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com