Tur Sowing : जतमध्ये तूर क्षेत्रात ८०० हेक्टरने घट

जत तालुक्यात तुरीचे सरासरी क्षेत्र ५ हजार ५८४ हेक्टर इतके आहे. कोरडवाहू भागात तूर पीक प्राधान्याने घेतले जाते. जत तालुक्यात सर्वाधिक तुरीचे क्षेत्र वाढू लागले आहे.
Tur Sowing
Tur SowingAgrowon

सांगली ः जिल्ह्यातील जत तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षांत तूर लागवडीकडे (Tur Cultivation) शेतकऱ्यांचा कल वाढला होता; मात्र, गतवर्षी तालुक्यात तुरीला पोषक असे वातावरण नसल्याने तुरीवर वांझ रोगाचा प्रादुर्भाव (Tur Disease) झाला. त्यामुळे तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Tur Crop Damage) झाले. त्यामुळे यंदा तालुक्यातील तुरीचे क्षेत्र ८०० हेक्टरने (Tur Area) घटले असल्याचे चित्र आहे.

Tur Sowing
Tur : सरकारचा तूर उत्पादकांना पुन्हा झटका

जत तालुक्यात तुरीचे सरासरी क्षेत्र ५ हजार ५८४ हेक्टर इतके आहे. कोरडवाहू भागात तूर पीक प्राधान्याने घेतले जाते. जत तालुक्यात सर्वाधिक तुरीचे क्षेत्र वाढू लागले आहे. वास्तविक पाहता गेल्या तीन ते चार वर्षांपूर्वी या भागात अपेक्षित पाऊस नाही. त्यामुळे तुरीच्या क्षेत्रात घट झाली होती. परंतु २०१७ पासून तालुक्यात उन्हाळी पाऊस वेळेत होत असल्याने तूर पिकाच्या पेरणीसाठी शेतकरी त्याचे नियोजन करू लागले आहेत. त्यातच मॉन्सूनदेखील पडू लागला आहे. त्यामुळे पेरणी वेळेत करत आहेत.

Tur Sowing
Tur Import : तूर आयातीसाठी पाच वर्षांचे करार

गेल्या वर्षी जत तालुक्यात ९ हजार ८३ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला होता. सुरुवातीच्या काळात अपेक्षित पाऊस झाला. त्यामुळे तूर पीक चांगले बहरले होते; मात्र त्यानंतर फुले आणि शेंगाच आल्या नाहीत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधला. त्यादरम्यान बियाणे सदोष असल्याचे समोर आले. त्यामुळे तालुक्यातील तूर पिकातून काहीच उत्पादन हाती लागले नाही. त्यामुळे यंदा खरीप हंगामातील ८ हजार २३२ हेक्टरवर पेरा झाला आहे. अर्थात, ८५१ हेक्टरने तुरीचा पेरा कमी झाला आहे.

उडीद व मुगाचे क्षेत्र वाढले

तूर पिकाचे नुकसान झाल्याने तूर उत्पादक शेतकरी उडीद व मूग या पिकाकडे वळले आहेत. मुगाची १६७०, तर उडदाचा ९१८६ हेक्टरवर पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी तूर पिकावर वांझ रोगाचा प्रादुर्भाव आला होता. त्यामुळे तूर पिकाचे नुकसान झाले होते. यंदा तूर पेरणीवेळी बीजप्रक्रिया करण्यासाठी प्रबोधन करण्यात आले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया करून पेरणी केली आहे; मात्र शेतकऱ्यांनी तुरीऐवजी मूग व उडीद पिकाची निवड केली असल्याने तुरीच्या क्षेत्रात घट झाली आहे.
मनोजकुमार वेताळ, उपविभागीय कृषी अधिकारी, जत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com