Crop Damage : पहिल्या दोन महिन्यांतील पीक नुकसानभरपाईसाठी हवे ८०७ कोटी

यंदा मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, जालना या पाच जिल्ह्यांतील ८ लाख ११ हजार ८४५ शेतकऱ्यांच्या ५ लाख ८७ हजार ४६६ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

औरंगाबाद : मराठवाड्यात जून व जुलै महिन्यांत अतिवृष्टी व पुरामुळे (Crop Damage Due To Heavy Rain And Flooding) ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान (Crop Damage) झालेल्या ८ लाख ११ हजार ८४५ शेतकऱ्यांच्या पिकाच्या भरपाईसाठी (Crop Damage Compensation) ८०७ कोटी १५ लाख रुपये लागणार आहेत. याशिवाय ऑगस्टमध्येही नुकसान झाल्याने झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी अधिकचा निधी लागणार हे स्पष्‌ट आहे.

Crop Damage
Crop Damage : लाखांदूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

यंदा मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, जालना या पाच जिल्ह्यांतील ८ लाख ११ हजार ८४५ शेतकऱ्यांच्या ५ लाख ८७ हजार ४६६ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. यामध्ये ५ लाख ८१ हजार ७८२.१० हेक्‍टरवरील जिरायती पिकांसह ५०४० हेक्‍टरवरील बागायत व ६४३ हेक्‍टरवरील फळपिकांचा समावेश आहे. शासनाने एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त जास्त देऊ केलेली मदत लक्षात घेता या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी ८०७ कोटी १५ लाख ४ हजार रुपयांची गरज असणार आहे.

Crop Damage
Wild Animal Crop Damage : वन्यप्राण्यांकडून पीक नुकसानीचे काय?

त्यापैकी प्रतिहेक्‍टर १३६०० रुपये प्रमाणे ७९१ कोटी २२ लाख ३६ हजार रुपये जिरायती पिकांच्या नुकसानीसाठी, फळपिकांच्या नुकसानीसाठी २७ हजार रुपये प्रतिहेक्‍टरप्रमाणे १३ कोटी ६१ लाख रुपये तर फळपिकांच्या नुकसानीसाठी लागणाऱ्या ३६ हजार रुपये प्रतिहेक्‍टर प्रमाणे २ कोटी ३१ लाख ६८ हजार रुपयांचा समावेश आहे. याशिवाय जालना, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील जवळपास ७६ गावांतील ४९८.११ हेक्‍टर शेतजमीन अतिवृष्टी, पुरामुळे खरडून गेल्याने तिचे नुकसान झाले. या नुकसानीच्या भरपाईसाठी १ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी लागणार आहे.

याशिवाय ३३७३ पायाभूत सुविधांच्या झालेल्या नुकसानीपोटी ४३३ कोटी ६४ लाख ३२ हजार रुपयांची गरज आहे. ऑगस्टमध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील १ लाख ६३ हजार ३६९ शेतकऱ्यांच्या १ लाख ४० हजार ३३१ हेक्‍टर क्षेत्रावरील शेतिपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीचे पंचनामे जवळपास ४८ टक्‍के उरकले आहेत. पंचनाम्याअंती ३३ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान ऑगस्टमध्ये किती जिल्ह्यात झाले याचा अहवाल पुढे येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com