Sugarcane FRP : साखर कारखान्यांकडे एफआरपीचे ८१३ कोटी थकित

यंदाच्या हंगामातील ३६ कारखान्यांकडे आतापर्यंत ८१३.२९ कोटी रुपये एफआरपीचे थकीत आहेत.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon

Sugarcane Season माळीनगर : सोलापूर विभागातील ५० साखर कारखान्यांकडून (Sugar Mill) यंदाच्या हंगामातील १५ पर्यंतची ‘एफआरपी’चे (Sugarcane FRP) ४२२३.८९ कोटी रुपये रक्कम ऊसबिलाच्या स्वरूपात शेतकऱ्यांच्या पदरात पडले आहेत. यंदाच्या हंगामातील ३६ कारखान्यांकडे आतापर्यंत ८१३.२९ कोटी रुपये एफआरपीचे थकीत आहेत.

यंदा सोलापूर जिल्ह्यातील ३७ व धाराशिव जिल्ह्यातील १३ अशा एकूण ५० कारखान्यांनी विभागात गाळप हंगाम घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३७ कारखान्यांनी एफआरपीचे ३३१५.७५ कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ कारखान्यांनी ९०८.१४ कोटी रुपये १५ मार्चअखेर दिले आहेत.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : नांदेड विभागात १०८ कोटींची ‘एफआरपी’ अद्याप बाकी

असे असले तरीही सोलापूर जिल्ह्यातील २८ कारखान्यांकडे एफआरपीचे ७३४.०५ कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ८ कारखान्यांकडे ७९.२४ कोटी रुपये थकीत आहेत. सीताराम महाराज व विठ्ठलसाई या कारखान्यांनी १५ मार्चपर्यंतचा एफआरपी अहवाल अद्याप सादर केलेला नाही.

काही कारखान्यांनी अत्यंत कमी एफआरपी दिली आहे. मकाई २८.६४ टक्के, सिध्दनाथ ६१.५४ टक्के, भैरवनाथ (विहाळ) ५५.७८ टक्के, भैरवनाथ (लवंगी)-५८.१२, विठ्ठल रिफाइंड ३७.५८ टक्के, सहकार शिरोमणी-३६.५३ टक्के, संत कूर्मदास-६२ टक्के, भैरवनाथ (वाशी)-५३ टक्के, भीमा-२१.८७ टक्के एफआरपी दिली आहे.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : राज्यातील १३४ कारखान्यांनी तटवली ‘एफआरपी’

कारखानानिहाय १५ मार्चअखेर थकीत एफआरपी (कोटीत)

सोलापूर जिल्हा : सिद्धेश्वर-३३.०, संत दामाजी-२१.६०, मकाई-२५.७६, संत कूर्मदास-१७.०६, लोकनेते-३२.७४, सासवड माळी-२८.२२, लोकमंगल (बीबीदारफळ)-८.५०,

लोकमंगल (भंडारकवठे)-२.४७, सिध्दनाथ-४८.८३, जकराया-१३.६५, इंद्रेश्वर-२०.४२, भैरवनाथ (विहाळ)-३५.६६, भैरवनाथ (लवंगी)-३८.०१, युटोपियन-३३.७२, मातोश्री शुगर-२३.७२, भैरवनाथ (आलेगाव)-४४.५५, बबनरावजी शिंदे-१७.२७, ओंकार-०.४६, जयहिंद-१२.३०,

विठ्ठल रिफाईंड-८२.२६, आष्टी शुगर-१८.४२, भीमा-६५.५९, सहकार शिरोमणी-४४.२५, सीताराम महाराज-९.४९, धाराशिव (सांगोला)-१२.२२, श्री शंकर-२३.२९, आवताडे शुगर्स-१४.८५, विठ्ठल (गुरसाळे)-०.९५, येडेश्वरी-५.०९ धाराशिव जिल्हा : विठ्ठलसाई-४.८५, भैरवनाथ (वाशी)-२०.३७, धाराशिव (कळंब)-८.१४, भैरवनाथ (सोनारी)-३६.०७, लोकमंगल माऊली-३.२५, क्यूनर्जी-०.९५, डीडीएनएसएफए-२.१७, गोकुळ शुगर्स (श्री तुळजाभवानी)-३.४४.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com