Farm Road : अखेर शासनाचा निधी मिळाला; पाणंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार?

पाणंद रस्ते अत्यंत खराब असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत होती.
Panand Road
Panand Road Agrowon

Akkalkot Farm Road News : मतदार संघातील एकूण ३५ विविध पाणंद रस्ते (Panand Road) होऊन ३५ किलोमीटर रस्ता होणार आहे.

यामुळे शेतकरी बांधवांची पावसाळ्यात होणारी दळणवळणाची गैरसोय दूर करण्यासाठी प्रतिकिलोमीटर २३ लाख ९८ हजार रुपयांप्रमाणे ३५ किलोमीटरकरिता आठ कोटी ३८ लाख ३० हजार रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.

Panand Road
Chandrapur : चंद्रपुरातील पाणंद रस्ते निधीअभावी रखडले

शिवाराकडे जाणारे पाणंद रस्ते अत्यंत खराब असल्याने शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होत होती. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस कारखान्याला पाठविणे अथवा शेतकऱ्यांची गहू, ज्वारी, तांदूळ, हरभरा, तूर आदी नगदी पिके बाजारपेठेत आणणे शेतकऱ्यांना अत्यंत जिकिरीचे होते.

Panand Road
Farm Road : आधी शेतरस्ते, मगच ‘समृद्धी’ची भिंत

त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे शेत पाणंद रस्ते तयार करण्याकरिता ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते’ योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. त्या योजनेतून ही अकरा कामे मार्गी लागली आहेत.

यासाठी कल्याणशेट्टी यांच्या प्रयत्नांतून एकूण ३५ पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्यास मदत होणार आहे.

मंजूर पाणंद रस्ते...

हन्नूर ४ किमी, करजगी ४ किमी, सलगर १ किमी, पितापूर २ किमी, बोरी उमरगे १ किमी, जेऊरवाडी १ किमी, संगदरी ३ किमी, तडवळ १ किमी, अंकलगे १ किमी, दर्शनाळ १ किमी, गोगाव १ किमी, रुद्देवाडी १ किमी, सिन्नूर १ किमी, किणी १ किमी, धारसंग १ किमी

अंदेवाडी ज. १ किमी, चिकेहळ्ळी १ किमी, गळोरगी १ किमी, कंटेहळ्ळी १ किमी, हसापूर १ किमी, काझीकणबस १ किमी, जकापूर १ किमी, रामपूर १ किमी, दहिटणेवाडी १ किमी, बागेहळ्ळी १ किमी, वागदरी १ किमी आदी २६ गावांसाठी ३५ किमी पाणंद रस्त्यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com